बल्लारपूर पोलिसांचा तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध
संग्रहित छायाचित्र |
बल्लारपूर: पोलिसांनी कठोर मेहनत आणि तांत्रिक तपासाद्वारे भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीने कौटुंबिक कलहामुळे संतापाच्या भरात मंदिरातील हनुमानजीची मूर्ती तोडून ती गाभाऱ्याबाहेर फेकून केली होती विटंबना. Hanuman Temple Incident
११ ऑक्टोबर २०२४ रोजी भिवकुंड नाला विसापुर येथील मंदिरातील हनुमानजीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली. या घटनेवरून गुन्हा क्रमांक ९७१/२०२४ भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ अन्वये नोंद करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळावर तांत्रिक पुरावे गोळा करत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपीने कौटुंबिक कलहातून संतापाच्या भरात हनुमानजीच्या मूर्तीची विटंबना केल्याचे उघड झाले. त्याच्या पत्नीचा राग आणि पत्नीच्या माहेरी जाण्यामुळे झालेल्या वैयक्तिक संघर्षामुळे आरोपी संतप्त होता.
आरोपी चंद्रपूरहून मोटारसायकलवरून बल्लारपूरकडे जात असताना सैनिक शाळेजवळ मोटारसायकलची एक्सलेटर वायर तुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभी करून तो मंदिराजवळ लिफ्ट शोधत होता. कोणीही लिफ्ट न दिल्यामुळे आणि कौटुंबिक तणावामुळे संतापाच्या भरात त्याने मंदिरातील हनुमानजीची मूर्ती तोडून गाभाऱ्याबाहेर फेकली आणि चंद्रपूरला पायदळ परतला.
सदर प्रकरणातील तपास आणि अटकेची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, सपोनि अंबादास टोपले, गजानन डोईफोडे, आनंद परचाके, आणि रणविजय ठाकुर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते. प्रकरणाच्या यशस्वी उकलीसाठी पोलीस पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Hanuman Temple Incident
बल्लारपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अज्ञात आरोपीला अटक करून कायद्याची कडक अंमलबजावणी दाखवून दिली आहे. हनुमान मंदिरातील या मूर्ती विटंबना प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे जनतेत विश्वास वाढला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही तांत्रिक पद्धतींचा प्रभावी वापर केला. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आमचे पथक सातत्याने प्रयत्नशील राहिले. स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केल्याने तपास प्रक्रियेतील आव्हानांवर मात करणे शक्य झाले. कायदा व सुव्यवस्था राखणे आमचं प्रथम कर्तव्य आहे, आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी सतर्क राहणार आहोत. — श्री. सुनील गाडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बल्लारपूर
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #Bhadrawati #TempleVandalism #HanumanIdol #PoliceInvestigation #CrimeReport #BreakingNews #MaharashtraPolice #CommunityVigilance #SocialJustice #CriminalLaw #IPCSection298 #TempleSecurity #MotorbikeCrime #PublicResponse #LawEnforcement #SocialAwareness #LocalNews #PoliceEfforts #ChandrapurCrime #MaharashtraUpdates #BhivkundNalaIncident #TempleIncident #PublicSafety #InvestigationUpdates #RajuraUpdates #ChandrapurDistrict #PoliceAction #CrimePrevention #CommunitySupport #SocialImpact #NewsAlert #RegionalNews #LatestUpdates #Ballarpur #HanumanTempleIncident