Lakhmapur Accident : शेतमजूर रमेश टेकाम यांना न्याय द्या: भूषण फुसेची मागणी

Mahawani

टेकाम कुटुंबीयांना २० लाखाचे आर्थिक सहाय्य तात्काळ द्या अन्यथा मोठे अनोदोलन पुकारू

Bhushan Phuse visiting the Tekam family
टेकाम परिवाराची भेट घेताना भूषण फुसे


गडचांदूर: कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे १६ ऑक्टोबर रोजी शेतमजूर रमेश टेकाम (वय ४७) यांचा रोटावेटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या टेकाम यांना ट्रॅक्टर मालक रवींद्र वडस्कर यांनी रोटावेटरची अडलेली माती साफ करण्याचे काम दिले होते. काम सुरू असताना अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्याने टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा शरीराचे तुकडे-तुकडे होऊन विदारक दृश्य निर्माण झाले होते. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. Lakhmapur Accident


सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांची संवेदनशील भेट

दि. १८ ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मृतक रमेश टेकाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत घटनेचा सविस्तर आढावा घेतला. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मागणीप्रमाणे वीस लाख रुपयांचे नुकसानभरपाई मिळावी, परंतु त्यांना केवळ एक लाख रुपये मदत मिळाली असून, उर्वरित दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. टेकाम कुटुंबीयांना न्याय मिळावा, या हेतूने भूषण फुसे यांनी घटनेतील निष्काळजीपणाची जबाबदारी ठरवण्यासाठी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.


                                                                      


पोलिसांची भूमिका आणि कुटुंबीयांचा आक्रोश

टेकाम कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात रमेश टेकाम यांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या कथित निष्काळजीपणाला दिले. मात्र, फुसे यांनी पोलिसांच्या या निष्कर्षावर तीव्र आक्षेप घेतला असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. "एक निर्दोष शेतमजुराचा जीव गेला आहे, आणि हे प्रकरण थातूरमातूर कारण देऊन मिटवले जाणार नाही," असे फुसे यांनी ठामपणे सांगितले.


२० लाखांची मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

फुसे यांनी कुटुंबीयांच्या न्यायासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "टेकाम कुटुंबीयांना २० लाख रुपयांची मदत मिळालीच पाहिजे. जोपर्यंत या मागणीची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," असा इशारा त्यांनी दिला आहे. घटनेची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


या घटनेने शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. स्थानिक पातळीवर मजुरांकडून काम घेताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वारंवार होत असतो. रमेश टेकाम यांच्या मृत्यूनंतर सरकार आणि स्थानिक प्रशासनाने गंभीर पावले उचलली नाहीत, यावर लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वीही मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता, मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.


रमेश टेकाम यांच्या मृत्यूने कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मजुरांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. फुसे यांच्या पाठपुराव्यामुळे कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. जर सरकारने आणि प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेतला नाही, तर हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. Lakhmapur Accident


टेकाम कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना २० लाखांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भूषण फुसे यांच्या नेतृत्वात एक मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. या घटनेने शेतमजुरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाला गती दिली असून, यापुढील काळात या विषयावर ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे अशी अपेक्षा स्थानकातून व्यक्त केली जात आहे. 




रमेश टेकाम यांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे. आमच्या प्राथमिक तपासात निष्काळजीपणामुळे रमेश टेकाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरुद्ध IPC कलम ३०४-अ, ३३७, आणि ३८४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असून पोलीस प्रशासनाकडून कोणताही निष्काळजीपणा झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. - श्री. शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, गडचांदूर पोलीस स्टेशन


#Mahawani #MahawaniNews #MahawaniUpdates #TractorAccident #FarmersIssue #BhushanFuse #Gadchandur #SocialJustice #Korpana #Chandrapur #RuralNews #MaharashtraNews #AccidentInquiry #FarmersRights #marathiNews #JusticeForFarmers #AgricultureAccident #FarmersDeath #CompensationDemand #TractorRotavatorAccident #FarmWorkerSupport #IPC304A #MaharashtraTragedy #AccidentInvestigation #LegalAction #FarmerProtest #VillageNews #TractorIncident #JusticeInFarming #RuralMaharashtra #AgriculturalCrisis #MaharashtraUpdates #ChandrapurNews #LocalNews #FarmSafety #LabourRights #RotavatorAccident #AccidentAwareness #TractorSafety #AccidentCompensation #FarmersStruggle #HumanRightsInRural #AgriculturalLabour #RotavatorSafety #BhushanFuseCampaign #AccidentJustice #VillageAccident #FarmersWelfare #GadchandurUpdates #KorpanaUpdates #MaharashtraElections2024 #FarmerSupportSystem #JusticeForFarmWorker #ViralNews #BreakingNewss #LaborAccident

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top