पक्षाने ऐनवेळी दिलेला धोका कधीच विसरणार नाही - सूरज ठाकरे
सूरज ठाकरे |
राजुरा: आम आदमी पक्षाने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील सूरज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसला आहे. ठाकरे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत सांगितले की, "हा विजय आमचाच होता, पण पक्षाने धोका दिला. दुसऱ्या पक्षांसाठी सतरंज्या उचलण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमुखाने पक्षातून सामूहिक राजीनामे दिले आहेत." New Political Party
सूरज ठाकरे यांचा आरोप आहे की आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील धोरणांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना मजूर समजले जात आहे. “गुजरातमध्ये बसलेला महाराष्ट्र प्रमुख आमच्या विरोधाला कानीही घेत नाही,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या संघटनेवर तीव्र टीका केली.
सूरज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. "२०१८ पासून जनतेसाठी काम करत विश्वास निर्माण केला होता. मात्र, या निवडणुकीत हजार-दोन हजार मतांनी पराभूत होण्यापेक्षा मी आता माझा स्वतःचा विदर्भ नवनिर्माण पक्ष उभारणार आहे," असे त्यांनी जाहीर केले.
राजुरा परिसरात लोकांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ठाकरे यांची योजना आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विदर्भ नवनिर्माण पक्षाचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सूरज ठाकरे यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत सांगितले की, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवा सुधारणा, आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेचा विकास यावर निर्णायक लढा उभारला जाईल. "नव्या सरकारच्या स्थापनेनंतरही परिस्थितीत बदल होईल, असे मला वाटत नाही. त्यामुळे आम्ही ठोस आंदोलनांद्वारे राजुरा परिसर हादरवून सोडू," असा इशारा त्यांनी दिला.
सूरज ठाकरे यांच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजुरा क्षेत्रातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. ठाकरे यांचा 'विदर्भ नवनिर्माण पक्ष' ही नव्या राजकीय शक्तीचा उदय दर्शवते. यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. New Political Party
आम आदमी पक्षाच्या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे अस्वस्थ ठाकरे यांनी नव्या पक्षाची स्थापना करत स्थानिक पातळीवर स्वतःचा प्रभाव वाढवण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #election #politics #Vidarbha #newparty #surajthackeray #AAP #rajuranews #assemblyelections #partydefection #localpolitics #boothleaders #massresignation #panchayat #zillaparishad #newpoliticalparty #politicalstrategy #farmersissues #unemployment #educationreforms #healthcare #governmentpolicies #grassrootsmovements #oppositionparty #MaharashtraPolitics #partystrategy #electionboycott #politicalchange