POCSO Case : जिवती पोक्सो प्रकरणात आरोपीला वीस वर्षांची शिक्षा

Mahawani

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा

POCSO Case : जिवती पोक्सो प्रकरणात आरोपीला वीस वर्षांची शिक्षा
संग्रहित छायाचित्र

जिवती: जिवती पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका गंभीर पोक्सो प्रकरणात न्यायालयाने काल आरोपी साईराम संजय गायकवाड (२१) रा. जिवती याला २० वर्षाची कठोर शिक्षा ठोठावली तसेच ५,००० रुपये दंड न भरल्यास १२ महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल, असा निकाल अति. जिल्हा न्यायाधीश, विशेष न्यायालय (पोक्सो), चंद्रपूर यांनी दिला आहे.


दिनांक ६ मार्च २०२० रोजी सायंकाळी १२:३० ते १ वाजता दरम्यान फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन नातसुनबाळीचा गायब होण्याचा प्रकार घडला. लोलडोह (ता. जिवती) येथे शोधमोहीम राबवून आरोपी साईराम गायकवाड याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.


तक्रारीवरून जिवती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३/२०२० अंतर्गत कलम ३६३ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत पीडित मुलीने सांगितले की, आरोपीने पळवून नेल्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला आणि धमकीही दिली. वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारावर गुन्ह्यात कलम ३७६ (२)(एन), ३७६ (२)(जे) भादवी व पोक्सो कायद्याचे कलम ४, ५(एल), ६ अंतर्गत गुन्हा वाढवून पोलीस उपनिरीक्षक रेखा बन्सी काळे (पोक्सो तपास पथक, गडचांदूर) यांनी तपास करून दोषारोपपत्र ९ जुलै २०२१ रोजी सत्र न्यायालयात दाखल केले.


                                                        


२२ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यायालयाने सुनावणी पूर्ण करत आरोपी साईराम गायकवाड याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ५,००० रुपयांचा दंड न भरल्यास १२ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा होईल, असेही न्यायालयाने जाहीर केले. या खटल्यात सरकारी वकील महाजन साहेब यांनी प्रभावी भूमिका बजावली, तर तपासादरम्यान सचिन राखुंडे आणि पोलीस अंमलदार दिनेश गरमडे (ब.न. १११७) यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.


पोक्सो प्रकरणातील हा निकाल पिडितेला न्याय देण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आरोपीला कठोर शिक्षा देऊन अशा गुन्ह्यांविरोधात कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासातील शिस्तबद्धता न्यायालयीन निर्णयामध्ये निर्णायक ठरली. हा निकाल केवळ पिडितेला न्याय मिळवून देण्यापुरता मर्यादित नसून, भविष्यात अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. तसेच तपास यंत्रणांची कामगिरी आणि न्यायालयीन प्रक्रियेने पिडितेला न्याय मिळवून दिला आहे. हा निकाल समाजात सकारात्मक संदेश पसरवेल आणि अशा गुन्ह्यांवर कठोर उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास निर्माण करतो.


#ChandrapurCrime #MaharashtraLaw #JusticeForSurvivors #PoliceAction #Mahawani #MahawaniNews #veerpunekar #Chandrapur #Jiwati #POCSOCase #POCSOAct #ChildProtection #ChandrapurCrime #MaharashtraLaw #JusticeDelivered #PoliceInvestigation #Jiwati #ChandrapurCourt #VeerPunekar #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #veerpunekar #ChandrapurUpdates #IndianJudiciary #CrimeAwareness #StopChildAbuse #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #marathiNews #veerpunekar #Chandrapur #Rajura #Korpana #POCSOCase #IndianLaw #LegalVerdict #JusticeServed #MaharashtraNews #ChildProtection #PoliceInvestigation #CrimeNews #CourtVerdict #SocialAwareness #LegalUpdate #IndianJudiciary #POCSOAct #LawAndOrder #JudgementDay #CriminalLaw #IndianCourtCase #YouthCrime #ChandrapurUpdates #BreakingNews #LegalProceedings #VictimSupport #MaharashtraCrime #RegionalNews

To Top