Sexual Assault Case : कोरपना बाजार बंद; दोषींना फाशीची मागणी

Mahawani

भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश; दोषींना फाशी देण्याची फुसे आणि सर्वसामान्यांची मागणी

Sexual Assault Case : Bhushan Phuse speaking at Korpana bandh protest
भूषण फुसे कोरपना बंद आंदोलनात बोलताना

  • महावाणी : विर पुणेकर

कोरपना: येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक अमोल लोडे यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर केलेल्या वासनांध कृत्याच्या निषेधार्थ आज कोरपना बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये हजारो नागरिकांनी  सहभाग घेतला असून संपूर्ण बाजाराला कडकडीत बंद पाळण्यात आले होते. यामुळे संपूर्ण कोरपना परिसरात जनतेच्या आक्रोशाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनामुळे पोलिस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून स्थानिक लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. Sexual Assault Case


 



सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या बंदमध्ये कोरपना शहरातील सर्व दुकानें आणि व्यवसाय पूर्णतः बंद ठेवण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायाने बाजार बंद पाळत या घटनेच्या विरोधात एकत्र येऊन आक्रोश व्यक्त केला. "आमच्या मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीही करू," अशी भूमिका जनतेने घेतली असून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, विशेषतः अमोल लोडे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


भूषण फुसे यांनी या प्रकरणात स्थानिक नागरिकांसोबत एकजूट करत सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रखरपणे मांडला आहे. त्यांनी सांगितले की, "हे अत्याचार आमच्या मुलींच्या भवितव्यावर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर थेट आघात आहेत. आम्ही शांत बसणार नाही, आम्ही न्यायासाठी लढणार आणि दोषींना त्यांची योग्य शिक्षा मिळवूनच थांबणार."


या बंदमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनि "आरोपीला तात्काळ अटक करा", "अल्पवयीन मुलींसाठी न्याय मिळवा", आणि "फाशीची शिक्षा लागलीच द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकले होते. या बंदमुळे संपूर्ण कोरपना परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले असून लोकांच्या आवाजात राग आणि व्यथेला स्थान मिळाले आहे.


आरोपीला अटक:

पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी अमोल लोडे याला अकोला बस स्टँड येथून अटक केली आहे. आरोपी मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांनी त्याला तत्काळ पकडून अटक केली. आरोपीला आता पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. या अटकेनंतर स्थानिक जनतेमध्ये थोडी समाधानाची भावना निर्माण झाली आहे, परंतु अजूनही कठोर शिक्षा मिळण्याची मागणी कायम आहे.


पोलिस प्रशासनावर दबाव:

कोरपना बाजारातील बंदमुळे पोलिस प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यासाठी मोठा दबाव आला आहे. पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी पत्रकारांना सांगितले की, "अमोल लोडे याला अटक करण्यात अली असून आम्ही या प्रकरणात अधिक तपास करत आहोत आणि या प्रकणातील दोषींना लवकरच पकडण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कठोर पावले उचलले आहे"


प्रशासनाला आता आपल्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याची जनतेने सूचना दिली आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे आणि या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर पकडली आहे.


भूषण फुसे यांचा आक्रमक आवाज:

सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी या घटनेबद्दल अत्यंत कठोर प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही अन्यायाच्या विरोधात उभे राहण्यास तयार आहोत. जर दोषींना फाशीची शिक्षा मिळाली नाही तर आम्ही कोरपना शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आव्हान करतो," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. फुसे यांचा आक्रमक आवाज आणि जनतेच्या समर्थनाने प्रशासनाला त्वरित कारवाई करण्यासाठी भाग पाडले आहे. Sexual Assault Case


भूषण फुसे यांच्या नेतृत्वात या बंदमुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे, ज्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन या अमानवी कृत्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. या घटनेने शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून याबद्दल लवकरच कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही फुसे यांनी नमूद केले आहे.


कोरपना बाजाराच्या बंदमुळे संपूर्ण समाजाने दोषींविरोधात आवाज उठवला आहे आणि या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी उभे राहण्याची दृढ इच्छा दर्शवली आहे. शिक्षण संस्थांमध्ये अशा घटना होणे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करणारे आहे. भूषण फुसे यांच्या नेतृत्वात, लोकांनी एकत्र येऊन आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी संघर्ष सुरू केला आहे, ज्यामुळे या प्रकरणात कठोर न्याय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.


कोरपण्यातील सर्व पालक आणि मुलींना माझे आव्हान आहे - कुणालाही घाबरू नका, समोर या आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे त्यांनी सरळ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा. तुमच्या पाठिशी मी ठाम उभा आहे. - श्री. भूषण फुसे, सामाजिक कार्यकर्ते




#Mahawani #marathinews #KorapnaMarketShutdown #BhushanFuseProtest #JusticeForVictims #WomenSafety #SocialJustice #CommunitySolidarity #StopViolence #PublicOutrage #DemandJustice #EndChildAbuse #PoliticalPressure #StrictPunishment #NoMoreSilence #VoiceForVictims #SexualAssaultCase

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top