Sexual Assault : इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकाचा वासनांध कृत्याचा पर्दाफाश

Mahawani

कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक अमोल लोडे यांचा निंदनीय आणि अमानवी वर्तन उघड; ग्रामीण भागात संतापाची लाट

Sexual Assault
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी  : विर पुणेकर

कोरपना: येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेल्या निंदनीय घटनेने समाजात संतापाची लाट पसरली आहे. शाळेतील शिक्षक अमोल लोडे यांनी एका ११ वर्षीय विद्यार्थिनीसोबत केलेल्या वासनांध कृत्याचा पर्दाफाश झाला असून, पालक आणि नागरिकात मोठा संतप्त निर्माण झाले आहेत. शिक्षण संस्थांमध्ये अशा कृत्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमोल लोडे हे युवक काँग्रेसचे कोरपना शहर अध्यक्ष असून त्यांच्या राजकीय बळाचा वापर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. Sexual Assault


 



पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अमोल लोडे यांनी शाळेत आपल्या प्रभावाचा वापर करून मुलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये मोठा संताप दिसून येत आहे. लोडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत कोरपना येथील नागरिक रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बदलापूर घटनेनंतर अनेक शाळांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अमोल लोडे हे युवक काँग्रेसचे कोरपना शहर अध्यक्ष असून, त्यांनी इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे. लोडे यांच्या या कृत्यामुळे समाजात रोष पसरला असून, त्यांची वहिनी  महिला बालकल्याण समितीच्या सभापती असून ह्या हि त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, ज्यामुळे त्यांच्या कृत्यांवर योग्य ती कारवाई होण्यास विलंब होत असल्याचे दिसत आहे. लोडे यांचे राजकीय बळ आणि प्रभावामुळे या घटनेच्या चौकशीवरही राजकीय दबाव येत असल्याचा संशय नागरिकांमध्ये आहे.


या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम ३७६ (अत्याचार), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अडनिनियं २०१२ अंतर्गत कलम ०६ तसेच कलम ५०६ (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार, शिक्षणसंस्थेत असलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीवर केलेला अत्याचार गंभीर गुन्हा आहे, ज्यासाठी कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. Sexual Assault


पाच वर्षांपूर्वी, राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या शाळेतही अशीच घटना घडली होती. आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी अजूनही तुरुंगात आहेत. आता पुन्हा लोडे यांच्या राजकीय बळावर अशा घटना घडल्याने संपूर्ण गावात रोष आणि नैराश्य पसरले आहे.


शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी या अमानवी घटनेच्या निषेधार्थ कोरपना बंदची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दोषींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली असून, "पीडित मुलींना न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण कोरपना बंद करणार," असे फुसे यांनी स्पष्ट केले आहे. गावातील नागरिक आणि पालकांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी केली असून, स्थानिक प्रशासनावर दबाव वाढवला आहे.


या घटनेने शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांच्या हातीच जर अशी अमानवी कृत्यं घडत असतील, तर समाजात काय संदेश जात आहे? या घटनेत दोषी असलेल्या अमोल लोडे यांना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण संस्थांनी आणि समाजाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.


कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक अमोल लोडे यांचा वासनांध कृत्य उघड झाल्याने स्थानिक जनतेत संतापाची भावना पसरली आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी सर्वसामान्य मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी संपूर्ण कोरपना बंद करून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याचे आव्हान केले आहे.


या अत्यंत गंभीर प्रकरणात आम्ही दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची कटिबद्धता दर्शवित आहोत. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि त्यांच्या अटकेसाठी सर्व शक्यतेने प्रयत्नशील आहोत. शिक्षण संस्थांमध्ये अशा अमानवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही यथाशक्ती प्रयत्न करू. आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीडित मुलीला न्याय मिळवून देणे, आणि यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. या प्रकरणात न्यायाची शाश्वती दिली जाईल आणि गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा मिळेल. - श्री. दारासिंग राजपूतपोलिस निरीक्षक, कोरपना, पोलीस स्टेशन


या अमानवी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दोषींना कठोर शिक्षा देऊन पीडित मुलींना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. आम्ही या प्रकरणात शांत बसणार नाही आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवत राहू. जर पीडित मुलीला न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण कोरपना बंद करण्याचा आमचा ठरलेला इरादा आहे. प्रत्येक मुलीच्या सुरक्षेसाठी समाजाने एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. - श्री. भूषण फुसेसामाजिक कार्यकर्ते


#mahavani #marathinews #Korapna #EminenceSchool #AmolLode #YouthCongress #BhushanFuse #StrictPunishment #BhadlapurCase #SocialJustice #WomenSafety #PoliticalPressure #TeacherCrime #JusticeForVictims #SchoolSexualHarassment #Sexual Assault

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top