Tobacco Extortion Case | तंबाखू नियंत्रणाच्या नावाखाली सर्रास वसुली

Mahawani

दुकानदारांकडून पावतीशिवाय दंड वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार

Tobacco Extortion Case | Rampant collection in the name of tobacco control
वसुलीकर्त्यांना जाब विचारताना भूषण फुसे

गडचांदूर: तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचे आवरण घालून पानठेला दुकानदारांकडून बेकायदेशीर वसुली केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सरकारी चिकित्सक आणि डॉक्टरी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरात गडचांदूर नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक दुकानांत जाऊन तपासणीच्या नावाखाली कोणतीही पावती न देता दंड वसूल केला. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी या प्रकरणाची उघडपणे वाचा फोडली आहे. Tobacco extortion case


कोरपना तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपासून शासकीय चिकित्सक आणि वैद्यकीय शिक्षण घेत असणारे विद्यार्थी तंबाखूविरोधी कायद्याच्या अंतर्गत तपासणीसाठी विविध दुकानांवर छापे टाकत होते. यात तपासणीदरम्यान दुकानदारांना तंबाखू विक्रीसंदर्भात नियमभंग झाल्याचे सांगून त्यांच्यावर दंड लावण्यात येत होता. परंतु हा दंड भरताना दुकानदारांना कोणतीही पावती देण्यात येत नव्हती. पानठेला दुकानदारांचे नावे साध्या वहीवर लिहून पैसे वसूल करण्यात येत होते, ही बाब अत्यंत गंभीर आहे.


या वसुलीमध्ये सामील असलेल्या चिकित्सकांमध्ये काहींनी दंत चिकित्सक म्हणून काम केलेले असल्याचे समोर आले आहे, तर यात एक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दुकानदारांनी याबाबत चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्याशी संपर्क साधला असता भूषण फुसे यांनी नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत या तपासणी व वसुलीचा तपास सुरू केला. त्यांनी संबंधित दुकानदारांशी बोलून या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि यामागे असलेल्या बेकायदेशीर वसुलीचा पर्दाफाश केला. फुसे यांनी या चिकित्सक आणि विद्यार्थ्यांनी पावतीशिवाय दंड वसूल केल्याचे उघड होताच तत्काळ या प्रकरणातील सर्व दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारू असेही त्यांनी सांगितले आहे. 




भूषण फुसे यांच्या म्हणण्यानुसार, "तंबाखू नियंत्रण कायद्यातंर्गत नागरिकांचे आरोग्य सुधारावे हा हेतू आहे. मात्र याचा गैरवापर करून बेकायदेशीर वसुली करणे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. आम्ही या प्रकरणात दोषींवर तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी करीत आहोत."


भूषण फुसे यांच्या हस्तक्षेपामुळे गडचांदूर परिसरातील दुकानदारांमधील तणाव कमी झाला आहे. फुसे यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाईची खात्री दिल्यामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या उघडकीनंतर आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तंबाखू नियंत्रण कायदा २००३ (COTPA) हा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करण्यासाठी आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी आहे. परंतु या कायद्याचा गैरवापर करून काही जणांनी बेकायदेशीर वसुलीचा मार्ग अवलंबला आहे, हे एक चिंताजनक वास्तव आहे. पावतीशिवाय कोणत्याही प्रकारे दंड आकारणे हे कायद्याविरुद्ध आहे, आणि यामुळे अधिकाऱ्यांवर नागरिकांचा विश्वास कमी होत आहे. Tobacco extortion case


गडचांदूर येथे तंबाखू नियंत्रणाच्या नावाखाली झालेली बेकायदेशीर वसुली नागरिकांच्या हक्कांवर आघात करणारी आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. यामध्ये दोषी असलेल्या सर्व चिकित्सक आणि विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे.


#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #tobaccoextortion #illegalfines #COTPA #BhushanFuse #socialactivism #governmentextortion #unlawfulcollection #medicalstudents #tobaccocontrolabuse #Chandrapurnews #corruptioninhealthsector #retailextortion #medicalfraud #Maharashtranews #illegalpractices #publichealthlawviolation #unaccountedfines #antitobaccolaw  #Tobacco extortion case

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top