गिरीराज हॉटेल समोर पोलिसांचा सापळा: दोघांना अटक
अटकेतील आरोपींसह पोलीस कर्मचारी |
चंद्रपुर: चंद्रपुर पोलीसांनी अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. काल या मोहिमे अंतर्गत मा. श्री. मुमवका सुदर्शन, पोलीस अधिक्षक आणि मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वाची कारवाई केली आहे. Wildlife Crime
स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात अवैध धंद्यांची माहिती मिळवून कार्यवाही करण्याच्या हेतूने एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, काही इसम वाघ या वन्यप्राण्याची नखे विक्री करण्यासाठी चंद्रपुरच्या गिरीराज हॉटेलसमोर येणार आहेत.
या गंभीर गुन्ह्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आदेश देत कोर्टासमोरील गिरीराज हॉटेल येथे सापळा रचला. त्यानंतर, दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून ०२ नग वाघाची नखे जप्त करण्यात आली. १) नंदकिशोर साहेबराव पिंपळे (५१) रा. सिव्हील लाईल, रामनगर, चंद्रपुर, रविंद्र शिवचंद्र बोरकर (६५), रा. नगीनाबाग, गुरांचे दवाखान्यासमोर, चंद्रपुर असे आरोपींचे नावे आहे. असून दोन्ही आरोपी सह वाघाच्या नखांना पुढील कार्यवाहीसाठी मा. सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग चंद्रपुर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
चंद्रपुर पोलीसांची ही कारवाई स्पष्ट दर्शवते की अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास पोलीस सज्ज आहेत. वाघाच्या नखांची विक्री केवळ वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक दृष्टीनेही गंभीर गुन्हा आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते. पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे अशा गुन्ह्यांना रोखण्यास मदत मिळेल. पोलीस प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे चंद्रपुरात अवैध धंदे करणार्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जनतेनेही यामध्ये सहकार्य केले पाहिजे, ज्यामुळे चंद्रपुरमध्ये पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण होईल. Wildlife Crime
चंद्रपुर पोलीसांनी अवैध वाघ नखांच्या विक्रीविरुद्ध सखोल आणि प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाईने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की वन्यजीवांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे आणि या दिशेने मोठे पाऊले उचलली जात आहेत.
#ChandrapurPolice #WildlifeProtection #IllegalTrade #TigerClaws #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #marathiNews #WildlifeCrime #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #mahawaniNews #mahawani #MahawaniNewsHub #VeerPunekar #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #ChandrapurUpdates #MaharashtraEvents #DailyNews #LocalUpdates #BreakingMaharashtra #ChandrapurLocal #RegionalNews #TopHeadlines