Anti-Incumbency : सुभाष धोटे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ विवादात

Mahawani

ग्रामीण भागात नाराजी, अँटी इन्कमबन्सीचा तडाखा

Discontent in rural areas, anti-incumbency crackdown

राजुरा : काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांना आगामी निवडणुकीत मतदारांच्या तीव्र असमाधानाला सामोरे जावे लागत आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात झालेले अपुरे काम, वचनपूर्तीत आलेले अपयश आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे धोटे यांच्याविषयी असलेल्या नाराजीला अँटी इन्कमबन्सीचा Anti-Incumbency जोरदार तडाखा बसत आहे.


कोरपना तालुक्यातील आवाळपूर, गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी पाणी, रस्ते, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या अभावाचा अनुभव घेतला आहे. निवडणुकीत जनतेला जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची आश्वासने ठराविक असतात, पण धोटे यांनी दिलेली अनेक आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. गावागावात या वचने फक्त कागदावरच राहिली असून, त्यातून निर्माण झालेली निराशा आता मतांवर परिणाम करू शकते.


अधिक वाचा:  राजुरा येथे मद्य प्रेमींच्या गर्दीने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर


पाच वर्षांच्या कार्यकाळात धोटे यांच्या असहिष्णु वागणुकीबद्दलही गावात चर्चेचा विषय आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत काॅंग्रेसची सत्ता असावी यावर त्यांचा भर होता, परंतु ज्या गावांमध्ये विरोधक सत्ता स्थापन करत त्यांना विकास कामांतून वगळले जात होते, असे आरोपही मतदार करीत आहेत. या वागणुकीमुळे सामान्य मतदारांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


      


या निवडणुकीत धोटे यांच्या कार्यकाळातील अपयश हीच अँटी इन्कमबन्सी ठरण्याची शक्यता आहे. मतदारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावावर घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेत धोटे यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी वाढली आहे. राजकीय सूडभावनेने घेण्यात आलेले निर्णय आता त्यांच्यासाठी नकारात्मक परिणाम आणू शकतात.


आमदार सुभाष धोटे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील अपूर्ण वचनांमुळे मतदारांत निर्माण झालेली असंतोषता आता निवडणुकीत त्यांच्या आड येण्याची शक्यता आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे काम शिल्लक राहिल्यामुळे धोटे यांना मतदानात किंमत मोजावी लागणार असून सुभाष धोटे यांना अँटी इन्कमबन्सीचा Anti-Incumbency तडाखा बसत आहे. अपूर्ण वचने आणि विकासाच्या अभावामुळे मतदारांत नाराजी असून या निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.


आम्हाला पाच वर्षांत अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. आवाळपूर, विठ्ठलवाडा, गावांसारख्या अनेक गावांमध्ये रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, आणि आरोग्याच्या सोयी यांसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. आमच्या गावात अनेकदा दिलेल्या आश्वासनांची फक्त चर्चा होते, प्रत्यक्षात काम मात्र कुठेच दिसत नाही. आमदार साहेबाना विकास कामांची मागणी केली असता ते अगोदर सदर गावातून त्यांना किती मते मिळाली हे बघून विकास कामांची शिफारस करतात. तसेच कमी मते मिळाली असता कामे नाकारतात. यावेळी आम्हाला विकास आणि आमच्या मुलभूत गरजांवर लक्ष देणारा नेता हवा आहे. निवडणुकीच्या वेळी गावात फिरणं सोपं असतं, पण आमच्या अडचणी सोडवणं त्यांचं खरं काम आहे. - आवाळपूर, विठ्ठलवाडा येथील नागरिक


#MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #AntiIncumbency #Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #SubhashDhote #AntiIncumbency #RuralDevelopment #VoterSentiment #PoliticalNews #MaharashtraPolitics #AssemblyElections #ElectionCampaign #RuralChallenges #CongressCandidate #VoterDissatisfaction #PublicIssues #ElectionCoverage #LocalNews #GrassrootsPolitics #PoliticalPromises #DevelopmentIssues #VoterAwareness #PoliticalAccountability #ElectionUpdates #MaharashtraNews #PoliticalOutreach #SocialMediaCampaign #RuralInfrastructure #VoterDiscontent #AgriculturalIssues #HealthcareFacilities #PublicReactions #CampaignTrail #PoliticalAwakening #CitizensRights #ConstituencyConcerns #LeadershipChallenges #PoliticalTransparency #VoterEngagement #GroundReality #PoliticalCommitments #JournalisticIntegrity #ElectoralChallenges #CommunityVoices #VillagerConcerns #EconomicDevelopment #MaharashtraAssembly #ElectionInsights #CampaignStrategies

To Top