Chandrapur development | आमदार जोरगेवारांच्या विकासकामांचे फडणवीसांकडून कौतुक

Mahawani
3 minute read
0

विकासकामे आणि समाजकार्याच्या जोरावर जोरगेवारांची वाढली लोकप्रियता


चंद्रपूर : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांच्या प्रचारार्थ कोहिनूर तलाव येथे आयोजित भव्य सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून जोरदार समर्थन दिले. त्यांनी जोरगेवार यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांचे कौतुक करत त्यांचे काम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. Chandrapur development


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आमदार जोरगेवार यांच्या विकास कार्याचा उल्लेख करत "किशोर जोरगेवार यांनी राजकारणात केवळ विकासाची दिशा दाखवली नाही, तर समाजकारणातही प्रगती साधली आहे," असे म्हटले. विशेषतः गरीब आणि गरजूंना मोफत भोजन देणाऱ्या 'अम्मा का टिफिन' उपक्रमातून जोरगेवार गरजूंना दिलासा देत आहेत. या उपक्रमामुळे गरजूंसाठी आपुलकीने काम करणारे नेते म्हणून जोरगेवारांची ओळख निर्माण झाली आहे.


चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासासाठी जोरगेवार यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित करत फडणवीस म्हणाले, "चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी आम्ही १०० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. याचबरोबर महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी २४० कोटी रुपयांचा निधीही सरकारकडून मिळविला गेला आहे. पुढील वर्षी महाकाली महोत्सवात या विकास कामांचा संपूर्ण लाभ मतदारसंघाला मिळणार आहे." चंद्रपूरमध्ये धार्मिक स्थळांचा विकास आणि तीर्थयात्रांच्या प्रोत्साहनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.


      


यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचेही विशेषतः कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा योजना, किमान आधारभूत किंमतीच्या खालच्या भावात उत्पादन खरेदी आणि शेतीसाठी १२ तासांचा स्थिर वीज पुरवठा यांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठीच्या ह्या उपाययोजना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


फडणवीस यांनी महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५०% भाडे सवलत देण्यात आली असल्याचे जाहीर केले, त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलातही वाढ झाली आहे. 'लाडकी बहिण योजना' अंतर्गत महिलांच्या खात्यात मासिक १,५०० रुपये जमा करण्यात येत होते, जे वाढवून आता २,१०० रुपये केले जातील.


या सभेस अनेक मान्यवर नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेत भाजपचे नेते हंसराज अहिर, हरिष शर्मा, ओबीसी मोर्चाचे अशोकजी जीवतोडे, शिवसेना शिंदे गटाचे बंडू हजारे, राष्ट्रवादीचे नितीनजी भटारकर, पूर्व आमदार सुरेन्द्र वर्मा, आणि अन्य स्थानिक नेते यांची उपस्थिती होती. तसेच विजय राऊत, सविता कांबळे, आणि संदीप आवारी यांच्यासह अनेकांनी सभेत मार्गदर्शन केले. Chandrapur development


या भव्य सभेत महायुतीच्या उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना जबरदस्त पाठिंबा मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विकास कामांच्या गौरवात यश मिळविण्यासाठी आश्वासन दिले आणि मतदारांना त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.


मागील पाच वर्षांत चंद्रपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. अपक्ष आमदार असूनही मोठा निधी आणला असून बाबूपेठ उड्डाणपूल, रस्ते, अभ्यासिका, समाज भवन यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत आणि अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आता माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची साथ आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या विकासाला नव्या जोमाने चालना मिळेल, चंद्रपूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. अनेक महत्वाच्या कामांना त्यांची मदत लाभली आहे. आता मी त्यांच्या पक्षात असल्याने त्यांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. चंद्रपूरातील प्रदूषण आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत, फडणवीस यांचा पुढाकार या कामांसाठी मिळेल. - किशोर जोरगेवार


#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #kishorjoragewar #DevendraFadnavis #ChandrapurAssembly #AmmakaTiffin #development #Vidarbha #STbus #economicsecurity #farmers #cotton #soyabean #freeelectricity #ChandrapurDeekshabhoomi #MahakaliTemple #ChandrapurDevelopment #ChandrapurNews #BJPMaharashtra #BJPcampaign #farmersupport #publicmeeting #developmentwork #VidarbhaFarmers #agriculture #MahakaliFestival #chandrapurlatestnews #ladkibahinyojana #freescheme #BJPassemblycampaign #assemblyelection2024 #chandrapurupdates #MaharashtraPolitics #chandrapurelections #devendrafadnavisspeech #bharatiyajantaparty #nagpurdeekshabhoomi #Chandrapurcity #womenempowerment #publicwelfare #farmersrelief #socialservice #chandrapurnews #chandrapurpolitics #VidarbhaUpdates #politicalleaders #publicwelfareinitiative #womenbenefits #ChandrapurAssemblyElection

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top