चंद्रपूर पोलीसांची सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक धडक मोहीम
चंद्रपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने गंभीर पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली जात आहे. याअंतर्गत, चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अभिलेखात नोंद असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई सुरू असून त्यांची गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. Chandrapur Police
अमोल ईलमकर या व्यक्तीवर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, त्याची परिसरात दहशत आहे. त्याच्यावर दुर्गापूर, रामनगर, बल्लारशाह आणि चंद्रपूर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दुखापत, खुनाचा प्रयत्न आणि अश्लील भाषेत शिवीगाळ अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अनेकदा त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळेच या सराईत गुन्हेगाराच्या विघातक कृत्यांवर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड अधिनियम १९८१ (सुधारणा २००९ व २०१५) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.
या प्रस्तावावर जिल्हादंडाधिकारी मा. विनय गौड़ा यांनी दखल घेऊन अमोल ईलमकर यास १ वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला. मात्र, हद्दपार इसम मिळून न आल्याने पोलीस प्रशासनाने त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली आणि ५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याला मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ३ कुख्यात गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे चंद्रपूरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मोठे योगदान मिळाले आहे. Chandrapur Police
पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू मॅडम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, सहायक पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, आणि रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे.
#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #chandrapurpolice #assemblyelections #lawenforcement #safetyandsecurity #crimereporting #policeraid #electionsecurity #publicsafety #crimeprevention #securitymeasures #mpda #criminaljustice #safetymeasures #policeoperations #crimecontrol #chandrapurnews #marathibatmya #policeaction #crimeupdate #policeforce #maharashtranews #lawandorder #assemblypolls #criminalactivity #publicorder #safetyfirst #indianews #localupdates #socialsecurity #policereforms #governmentactions #publicconcern #communitysafety #assemblyelections2024 #stronglawenforcement #indianpolice #maharashtrapolice #publicawareness #crackdown #criminalelements #chandrapurtoday #marathinews #publicservice #mahapolice #regionalupdates #policeandpublic #safetyalert #socialwelfare