वणीतील ईव्हीएम स्ट्राँग रूमजवळील वाहनात इलेक्ट्रॉनिक साहित्य?
वणी : विधानसभा निवडणुक नुकतीच पार पडली असून सर्वांचे लक्ष येत्या २३ तारखेला होऊ घातलेल्या निवडणूक निकालाकडे लागले असता दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० च्या सुमारास वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील एव्हिम स्ट्राँग रूमजवळ EVM Strong Room संशयास्पद वाहन तब्बल चार तासापासून उभे असल्याचे आढळले. या वाहनात इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याचा संशय व्यक्त होत असून वाहनाची कागदपत्रे योग्य नसल्याने स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर वाहन वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, महिंद्रा बोलेरो पिक-अप (MH 14 LB 9017) हे वाहन स्ट्राँग रूमपासून १०० मीटर अंतरावर अनेक तास उभे होते. सुरक्षा व्यवस्थेचा भंग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहनाची चौकशी केली. वाहनातील साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे होते, मात्र त्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. बातसेच वाहन चालकाकडे वाहनाचे व वाहनातील साहित्याचे योग्य कागदपत्रे नसल्याने संशयात वाढ झाली आहे.
सदर प्रकार कळताच शिवसेना (उबाठा) गटाचे नेते, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होत. सदर प्रकरणाबाबत संबंधित पोलिसांना पाचारण करून वाहनाची तपासणी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बेहरणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन ताब्यात घेतले असून समोरील तपास सुरू आहे.
स्ट्राँग रूमच्या १०० मीटर परिघात कडेकोट सुरक्षा असूनही वाहन तिथे कसे पोहोचले, याबाबत नागरीकातून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावर वणी शहरात निवडणूक निकालावर संशयास्पद चर्चा सुरू झाली असून काही नागरिकांच्या मते, अशा संशयास्पद वाहनांमध्ये ईव्हीएमशी छेडछाड साहित्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा: मतदानादिवशी कराळे मास्तरांना मारहाण
संशयास्पद वाहन EVM Strong Room आढळल्याच्या वृत्तानंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनसमोर आपली हजेरी लावली होती. जमलेल्या नागरिकांना शांत ठेवण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आहे. सदर प्रकरणाने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची व संशयाची भावना निर्माण झाल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.
वाहनातील साहित्य नेमके काय आहे, यावर पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष दिलेला नसून. शहरात पुन्हा अशा वाहनांची हालचाल असल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांमध्ये तणाव पुन्हा वाढला आहे.
#Mahawani #MahawaniNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #Waninews #Waninewstoday #EVMSecurity #ElectionUpdate #StrongRoomIncident #WaniPolice #ShivsenaNews #UbhataShivsena #WaniElectionUpdate #MarathiNews #EVMVehicles #ElectionTension #ElectionSafety #WaniAssembly #ElectionProcess #PoliceAction #EVMControversy #SecurityBreach #MaharashtraNews #LatestUpdates #MahawaniExclusive #WaniExclusive #StrongRoomSafety #ChandrapurDistrict #EVMSecurityBreach #ElectionDayDrama #Election2024 #ShivsenaUpdates #ElectionControversy #MaharashtraPolitics #MarathiUpdates #BreakingNews #WaniBreakingNews #MahawaniHighlights #StrongRoomVehicle #MahawaniExclusiveUpdates #MarathiBatmya #WaniUpdates #MahawaniDistrictNews