Murti Airport | मूर्ती-विहिरगांव विमानतळ: स्वप्न की फसवणूक?

Mahawani

राजुरा परिसरातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प अद्यापही रखडलेलाच

The proposed airport project in Rajura area is still stalled.

राजुरा : मूर्ती विमानतळ प्रकल्प, जो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा भागात प्रस्तावित करण्यात आला होता, तो अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच राहिला आहे. हा प्रकल्प २०१८ साली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी लोकांच्या विकासाच्या अपेक्षांना चालना देण्यासाठी सादर केला होता. मात्र, आजपर्यंत त्यावर काहीच ठोस काम झालेले नाही. प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या नावावर मते मागणारे नेते मंडळी देखिल या बाबीवर एक चकार शब्द ही उच्चार करतांना दिसत नाहीत. कांग्रेस, शेतकरी संघटना, असो की भाजप किंवा कुठलाही अपक्ष उमेदवार प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जनतेला शब्द देतांना दिसत नाही. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूलथापा देवून त्यांची जमीन घेण्यात आली, ते याबाबतीत काय विचार करित असेल आणि राजुरा क्षेत्राची जनता आपले देताना या मुद्दयावर गंभीर विचार करेल काय, असे प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडले आहे. Murti airport


मूर्ती विमानतळाची संकल्पना प्रथम महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये मांडली. या प्रकल्पाचा उद्देश चंद्रपूर जिल्ह्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडणे हा होता. राजुरा तालुक्यातील मूर्ती-विहीरगाव गावाची निवड प्रकल्पासाठी योग्य भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीच्या उपलब्धतेमुळे करण्यात आली होती. २०१८ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या जागेचा पूर्व व्यवहार्यता अहवाल सादर केला आणि जागेला मान्यता देण्यात अली. त्यानंतर राज्य सरकारने ४६३ एकर खाजगी जमिनीचे भूसंपादन व इतर प्रक्रियेसाठी निधी मंजूर केला.


      


या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा प्रारंभिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले, काही निधीही वितरित झाला. ज्यात मूर्ती विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विकसित करण्याची योजना होती पहिल्या टप्यात ७२० एकर जमिनीवर २००० मीटर धावपट्टी उभारणे, ज्यात बॉम्बार्डियर Q400 आणि ATR 72 सारखी टर्बोप्रॉप विमाने हाताळण्याची क्षमता असेल. दुसऱ्या टप्यात एअरबस A-320 सारख्या अरुंद बॉडी जेट विमानांसाठी ३००० मीटरपर्यंत धावपट्टीचा विस्तार करणे होते. मात्र प्रत्यक्ष कामाला नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाने गती मिळालेली नाही. 


या प्रकल्पाला पाठिंबा देणारे नेते कालांतराने मागे पडले असून प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी कोणताही ठोस उपाययोजना झालेला नाही. प्रकल्प संबंधित विभागांमधील ताळमेळाचा अभाव हे या रखडण्याचे मोठे कारण ठरले आहे. सुरुवातीला २०० कोटी रुपयांचा अंदाज बांधला गेला होता. परंतु आजतागायत केवळ ५० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती आहे, त्यातीलही बहुतांश निधी प्रशासकीय खर्चातच खर्च झाला असून सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रकल्पावर कोणीही ठोस भूमिका मांडताना दिसत नाही. भाषणांमध्ये या विषयाचा उल्लेख प्रामुख्याने टाळला जात असून या प्रकल्पाची सध्याची स्थिती राजकीय नेत्यांच्या उदासीनतेचे प्रतिबिंब ठरत आहे. भूसंपादनानंतर सदर भागातील शेतकरी अद्यापही समाधान पावलेले नसल्याने मूर्ती विमानतळ: स्वप्न की फसवणूक? असे प्रश्न सर्वत्र विचारले जात आहे. 


अधिक वाचा: किसान जिनिंगमध्ये दुर्दैवी दुर्घटना : दोन बालकांचा मृत्यू


या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी) आणि स्थानिक प्रशासनावर आहे. मात्र, त्यांच्यातील दोषारोपामुळे प्रकल्प रखडत आहे. कालांतराने प्रकल्पाचे महत्त्व कमी झाले असल्याचे दिसून येत असून शासन, पालकमंत्री आणि स्थानिक नेते या प्रकल्पाला प्राधान्य का देत नाही हा मोठा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत मूर्ती विमानतळाचा उल्लेख न होणे हे प्रश्नांना पुन्हा मोठ्याने वाचा फोडत आहे. 


मूर्ती विमानतळ Murti airport प्रकल्पाचा अभ्यास करताना हे स्पष्ट होते की हा प्रकल्प केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडला आहे. याचा थेट परिणाम राजुरा परिसरातील विकासावर होत आहे. विमानतळामुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता होती. परंतु राजकीय उदासीनतेमुळे हे सुवर्णसंधी हुकत आहे.


मूर्ती विमानतळ प्रकल्पाच्या साकार होण्यास अनेक राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, योग्य नियोजन, निधीची तरतूद आणि राजकीय इच्छाशक्ती असेल, तर हा प्रकल्प भविष्यात पूर्ण होऊ शकतो.


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #MADC #GreenfieldAirport #MurtiAirport #ChandrapurAirport #VidarbhaDevelopment #MaharashtraAirports #InfrastructureProjects #AviationNews #ChandrapurDevelopment #VidarbhaGrowth #EconomicImpact #TourismBoost #EmploymentOpportunities #ATR72 #BombardierQ400 #AirbusA320 #RunwayExpansion #LandAcquisition #GovernmentProjects #PoliticalNeglect #UnfinishedProjects #AirportDelay #ElectionIssues #RegionalDevelopment #ProjectFunding #AdministrativeHurdles #AviationInfrastructure #RuralDevelopment #TransportProjects #VidarbhaEconomy #ChandrapurTourism #GreenfieldProjects #FutureOfChandrapur #AirportFunding #PoliticalCommitment #DevelopmentChallenges #InfrastructureGrowth #VidarbhaPotential #MaharashtraDevelopment #ChandrapurVision #AviationSector #PublicInfrastructure #UrbanGrowth #Murtiairport

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top