कार्यकर्त्यांचा सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश
जिवती : तालुक्यातील येल्लापुर (कोलागुडा) आणि टेकामांडवा येथील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावरील आपला विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वात विकासाच्या संधी शोधण्यासाठी आणि Rajura Vidhan Sabha तालुक्यातील समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, मच्छिंद्र मानकर, डॉ. जांभूळकर, भाऊराव कारेकर, तालुकाध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे आदींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचा दुपट्टा अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रवेश घेतलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये:
येल्लापुर (कोलागुडा) येथील रामा सिडाम, भीमा सिडाम, आयु मळावी, देवराव सिडाम, राजू मडावी, मारू आत्राम, शांताबाई कोडापे, गिरजाबाई सिडाम, लेथुबाई सिडाम, रामबाई सिडाम, भिमाबाई कोडापे, चित्राबाई सिडाम, कर्णुबाई आत्राम, लक्ष्मीबाई आत्राम, मारूबाई कोडापे, सतीश सिडाम, लक्ष्मण मडावी तर टेकामांडवा येथील दारूल शेख, आयसीराम सोनकांबळे, विठ्ठल कंचकटले, आनंद कोमले, विठ्ठल बंडे, संतोष येकेवार, संतोष वाघमारे, शुद्धोधन वाघमारे, मंगेश कोमले, अर्जुन बंडे, अरुण बंडे, गोंदनबाई वाघमारे, कमलबाई बंडे, रुक्मिणीबाई सोनकांबळे, फातिमा पठाण, सिद्धार्थ बंडे, समाधान बंडे, रावसाहेब गोटमवार, सुरेश घोबले, नूर मोहम्मद पठाण, बालाजी भोगणे, सुरज कंचकटले यांचा समावेश आहे.
अधिक वाचा: ही माझी शेवटची निवडणूक : सुभाष धोटेंचा मतदारांना भावनिक साद
या प्रवेशामुळे शेतकरी संघटनेला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाच्या पायाभूत शक्तीत वाढ झाली आहे. या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा पुरावा आहे. Rajura Vidhan Sabha ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धोटे यांचे कार्य आणि त्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे कार्यककर्ते बोलत आहे.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाढता ओघ हा तालुक्यातील राजकारणाच्या पटलावर मोठा प्रभाव टाकू शकतो. जिवती तालुक्यातील हे बदल आगामी निवडणुकीत काँग्रेसला एक मजबूत पायाभूत ताकद पुरवू शकतात.
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #rajura #korpana #Congress #SubhashDhote #FarmerUnion #Jiwati #Yellapur #Tekamandwa #PoliticalEntry #ChandrapurPolitics #Leadership #MaharashtraPolitics #FarmerMovement #Agriculture #CongressEntry #PoliticalShift #VoterSupport #LocalLeaders #DistrictBank #VijayraoBawane #GanpatAade #Sustainability #RuralDevelopment #AgriculturePolicy #CongressParty #PoliticalNews #MarathiUpdates #LocalIssues #Election2024 #FarmerWelfare #AgricultureGrowth #ChandrapurUpdates #TalukaNews #DistrictLevel #MahaVikasAghadi #CongressLeadership #PoliticalStrategy #PublicSupport #GrassrootPolitics #ShivajiNagar #VidarbhaNews #RuralEmpowerment #CongressStrength #Maharashtra