आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात विविध प्रकल्पांची यशस्वी पूर्तता
पत्रकार परिषदेतील छायाचित्र |
राजुरा : विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत समर्पणाने कार्यरत असलेले आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील मुलभूत गरजा ओळखून त्यांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर, तसेच विधानसभेत सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्यकाळात क्षेत्रात आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, आणि नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी भरीव योगदान दिले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात शेतकरी, विद्यार्थी, महिलांसह सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचे पत्रकार बांधवांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात ते बोलत होते. Regional Development
आरोग्य सेवांचे बळकटीकरण
आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले गेले असून, ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे मोफत सिटी स्कॅन तपासणी केंद्र, डायलिसिस केंद्राची उभारणी प्रगतीपथावर आहे. यासह क्षेत्रातील विरूर स्टेशन, भंगाराम तळोधी, धाबा, शेनगाव, नांदाफाटा येथे आरोग्य केंद्र निर्मिती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करून स्थानिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्यात यश आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सिंचन आणि विजेसाठी भरीव योगदान
शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजा भागवण्यासाठी ७० कोटी रुपयांचा गेटेड साठवण बंधाऱ्यांचा प्रकल्प राबविला. क्षेत्रातील विहीरगाव, अहेरी, डोंगरगांव, तोहगाव येथे ३३ केव्ही विद्युत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा मिळू लागला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण, ग्राम विकास योजना, आणि अन्य योजना राबवून रस्ते, अग्निशमन व्यवस्था, ठक्कर बाप्पा योजनेच्या विकासकामांद्वारे क्षेत्राचा विकास साधला आहे.
ग्रामविकास आणि नागरी सुविधा
राजुरा, गडचांदूर येथील महिला बचत भवन, नागरी सुविधा आणि तीर्थक्षेत्र योजनेतून दलित वस्ती, नक्षलग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पकडीगुड्डम धरणाच्या कॅनलींग प्रकल्पासाठी ११० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राजुरा, गोंडपिपरी येथे प्रशासकीय इमारतीची निर्मिती तसेच जिवती येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय व शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले आहे.
शिक्षण आणि सांस्कृतिक सुविधांचा विस्तार
सामाजिक न्याय विभागाच्या निवासी वस्तीगृहाची उभारणी करून विद्यार्थ्यांसाठी १०० क्षमतेचे निवासी सुविधायुक्त वस्तीगृह निर्माण करण्यात आले आहे. क्षेत्रात महापुरुषांच्या स्मृती जतन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगवान बिरसा मुंडा, शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे पुतळे उभारून त्यांच्या स्मृतींचा गौरव करण्यात आला आहे. तसेच स्थानिक युवकांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी यासाठी विविध वाचनालये, व्यायामशाळा आणि क्रीडांगणांची निर्मितीही झाली आहे.
पर्यटन आणि सौंदर्यीकरण
राजुरा येथे ८ कोटी रुपये निधीतून तलावांचे सौंदर्यीकरण, अमलनाला पर्यटन विकासासाठी ७ कोटी रुपये निधी मंजूर केला गेला आहे. क्षेत्रातील नागरिकांना पर्यटक सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी पर्यटन विकास आराखडा राबवण्यात आला आहे. तसेच भेंडाळा प्रकल्पाच्या शिल्लक कामांसाठी ३०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Regional Development
आ. सुभाष धोटे यांनी आपल्या कार्यकाळात राजुरा विधानसभा क्षेत्रात विकासाची क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील या विकासप्रकल्पांनी सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. येणाऱ्या काळातही क्षेत्रातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे. जनतेने त्यांच्या या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, अशी अपेक्षा त्यांनी आज पत्रकार दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात व्यक्त केली आहे.
#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #marathibatmya #SubhashDhoteyLeadership #RajuraDevelopment #RuralInfrastructure #HealthcareProjects #AgriculturalDevelopment #ElectricityProjects #DalitVastiDevelopment #NaxalAffectedDevelopment #PublicWelfare #TourismBeautification #RajuraConstituency #InfrastructureDevelopment #WaterConservation #SocialJustice #YouthEmpowerment #CulturalHeritage #EducationalInfrastructure #PoliticalLeadership #SubhashDhoteyProjects #MaharashtraPolitics #AssemblyElection #DevelopmentGoals #PublicFacilities #ModernAmenities #VillageDevelopment #WomenEmpowerment #PovertyAlleviation #CommunityDevelopment #PublicInfrastructure #RegionalDevelopment