Chandrapur Crime | कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

Mahawani

Effective performance of local crime branch; 45 animals taken into custody

स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कामगिरी; ४५ जनावरे ताब्यात

चंद्रपूर | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे २३ डिसेंबर २०२४ रोजी घुगुस Ghugus परिसरात धानोरा फाट्याजवळ नाकाबंदी करून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत ४५ गोवंश जनावरे कत्तलीसाठी वाहतूक करताना सापडली, ज्यामुळे जिल्ह्यात मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ट्रक क्रमांक CG 24 S-2672 चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली मार्गे घुगुसकडे जात असल्याची खबर मिळाली. माहितीच्या आधारे घुगुस रोडवरील धानोरा फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता, ट्रकमध्ये ४५ गाई आणि बैल अतिशय क्रूर पद्धतीने दाटीवाटीने कोंबून वाहतूक करताना आढळले. जनावरांचे पाय बांधून त्यांना Chandrapur Crime कत्तलीसाठी घेऊन जाण्याचे निर्दशनास आले.


कारवाईदरम्यान सापडलेल्या ४५ गोवंश जनावरांना तत्काळ प्यार फाउंडेशन गोशाळा, दाताळा, चंद्रपूर Chandrapur येथे दाखल करण्यात आले. यामध्ये प्राण्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेतली गेली. ट्रक क्रमांक CG 24 S-2672 आणि जनावरे यांची एकूण किंमत अंदाजे १९,१८,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकचालकासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन घुगुस पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ११(१)(घ), (ड), (च), (ज) आणि कलम ५(अ), ९, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध घालण्यात येतो.


     


पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा गुन्हा उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पथकात API कांक्रेडवार, PSI सामलवार, पोलीस हवालदार महात्मे, जयंता, चेतन, पोलीस अंमलदार वकाटे, सावे, आणि चापोहवालदार दिनेश यांचा समावेश होता. त्यांच्या तत्परतेमुळेच गोवंश जनावरांचे जीवन वाचवले गेले. चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल आणि अवैध वाहतूक ही गंभीर समस्या Chandrapur Crime बनली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकरणांना आळा घालण्याचा प्रयत्न झाला आहे.


हे वाचा: Land Purchase | अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना मिळणार स्वतःची शेती


गोवंश जनावरांच्या कत्तलीला Chandrapur Crime आळा घालणे आणि त्यांचे रक्षण करणे हे फक्त प्रशासनाचेच नाही, तर समाजाचेही कर्तव्य आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अनेक गोवंश जनावरांचे प्राण वाचले. प्रशासनाने अशीच सतर्कता राखून काम केल्यास भविष्यकाळात प्राणी संरक्षण अधिक सक्षम होईल. 


#Mahawani #VeerPunekar #MahawaniNews #Chandrapur #Rajura #MarathiNews #CrimeNews #AnimalRescue #ChandrapurPolice #AnimalProtection #GoshalainChandrapur #IllegalTransport #CowSlaughter #AnimalRights #AnimalWelfare #PoliceAction #LocalCrime #HumanityFirst #NewsInMarathi #GoshalainDatala #ChandrapurDistrict #SaveAnimals #PoliceEfficiency #MarathiUpdates #StopAnimalCruelty #AnimalTrafficking #PyarFoundation #DatalaGoshala #ChandrapurUpdates #InvertedPyramidNews #BreakingNewsInMarathi #LatestNewsChandrapur #AnimalCare #MarathiHeadline #LocalCrimeBranch #GopastProtection #ChandrapurAction #StopAnimalAbuse #PoliceIntervention #BreakingCrimeStory #MarathiJournalism #ChandrapurCrime

To Top