Chandrapur : शहर स्वच्छतेवर आमदारांचे ताशेरे; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील स्वच्छता व्यवस्थापनातील हलगर्जीपणावर ताशेरे ओढत आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे १५ दिवसांच्या आत Chandrapur शहर स्वच्छतेची विशेष मोहिम राबवून कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या हिराई सभागृहात आयोजित बैठकीत स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हिराई सभागृहात आयोजित या बैठकीत मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त अक्षय गडलींग, माजी नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत माजी नगरसेवकांनी स्वच्छता, नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था, आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांसंदर्भात तक्रारी मांडल्या. आमदार जोरगेवार Kishor Jorgewar यांनी तक्रारींची गंभीर दखल घेत स्वच्छतेच्या कामात झालेल्या ढिलाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “कंत्राटदारांची हलगर्जीपणा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे,” असे ते म्हणाले.
स्वच्छतेसाठी १५ दिवसांची मोहिम
आ. जोरगेवार यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, शहरातील सर्व गल्ल्या, रस्ते आणि नाले विशेष मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ करावेत. "१५ दिवसांत या मोहिमेचे काम पूर्ण झाले नाही, तर जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
माजी नगरसेवकांच्या सहकार्याचा आग्रह
Chandrapur शहर स्वच्छतेसाठी माजी नगरसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे जोरगेवार यांनी नमूद केले. “आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम केल्यास चंद्रपूर शहर आदर्श स्वच्छतेचे उदाहरण बनू शकते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर चर्चा
बैठकीत पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. "ज्या भागांमध्ये नळांना पाणी येत नाही, तेथे नळबिल आकारले जाणार नाही," असे स्पष्ट निर्देश जोरगेवार यांनी दिले. तसेच, तोटी नसलेल्या नळांना तोटी बसवण्याचेही आदेश त्यांनी दिले.
हे वाचा: बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात निषेध मोर्चा
अमृत २ योजनेतील दिरंगाईवर नाराजी
बैठकीत अमृत २ योजनेच्या कामांचा आढावा घेताना कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. "गुणवत्तेची पडताळणी आणि गती वाढवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेतली जाईल," असे ते म्हणाले.
विशेष समितीची स्थापना
स्वच्छता मोहिमेची प्रगती तपासण्यासाठी आ. जोरगेवार यांनी सहा लोकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. "समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील आढावा बैठक घेतली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर Chandrapur शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आमदार जोरगेवार यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्या कडक भूमिकेमुळे शहरातील स्वच्छता व व्यवस्थापन सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
#Mahawani #MahawaniNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #MarathiNews #CleanCityCampaign #MunicipalityReforms #UrbanSanitation #HealthAndHygiene #UrbanDevelopment #CivicResponsibility #PublicHealth #SwachhBharat #SanitationDrive #Amrut2 #MunicipalMeet #ChandrapurNews #SwachhChandrapur #CivicIssues #WasteManagement #WaterSupplyIssues #SolidWasteManagement #UrbanCleanliness #CommunityHealth #NagarPalika #CleanCityGoals #15DaysChallenge #MunicipalCommittees #AccountabilityDrive #PublicSanitation #CleanIndiaMission #MunicipalReforms #CityCleanliness #EnvironmentalManagement #WasteDisposal #UrbanWelfare #ChandrapurUpdates #CitizenParticipation #SwachhCityMovement #HealthAwareness #CivicAccountability #CityDevelopment #NagarVikas #Chandrapur