कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव
चंद्रपूर: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ CM oath घेतली. यानिमित्ताने चंद्रपूरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणात थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शपथविधी सोहळा सुरू होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.
मुंबई येथील आजाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
चंद्रपूरात गांधी चौक येथे भाजपच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शपथविधी सुरू होताच जल्लोष साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भाजप नेत्यांसह सामान्य नागरिकांचीही उपस्थिती होती.
नागरिकांचा प्रश्न:
शपथविधी सोहळ्याच्या आयोजनावरून काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, "लोकांच्या विकासकामांसाठी आणि सोयीसुविधांसाठी सरकारी यंत्रणा अधिकाधिक काम करणे अपेक्षित आहे परंतु त्याच यंत्रणा अशा जल्लोषात प्रामुख्याने गुंतवला जातात, अशा वेळी फडणवीस सरकारचा लोकहितासाठी काय ठोस कार्यक्रम आहे?" काहींनी असेही मत व्यक्त केले की, "शपथविधीला लागलेल्या खर्चाचा उपयोग सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर व्हायला हवा होता."
भव्यतेच्या माध्यमातून पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा हा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला. मात्र, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा आणि प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचे काहींचे मत आहे. जल्लोष करताना स्थानिक स्तरावर महत्त्वाच्या विषयांवर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड CM oath पक्षासाठी महत्त्वाची मानली जात असली तरीही, सर्वसामान्य नागरिकांना आशा आहे की नवीन सरकार स्थानिक आणि राज्यस्तरावरील समस्यांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करेल.
शपथविधी सोहळा चंद्रपूरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मात्र, नागरिकांच्या मनात अजूनही विकासकामांबाबत अनेक प्रश्न उद्भवत असून आगामी सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अनुभवी नेता महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मिळाला आहे, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नवीन उंचीवर जाईल, असा आमचा विश्वास आहे. - आमदार, किशोर जोरगेवार
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #DevendraFadnavis #Shapathvidhi #BJP #MaharashtraPolitics #PoliticalNews #CMOathCeremony #ChandrapurUpdates #MarathiBreakingNews #MaharashtraUpdates #PoliticalEvents #ChandrapurCelebrations #TopNews #LatestNews #BreakingNews #BJPUpdates #FadnavisCM #PoliticalHighlights #MarathiUpdates #NewsHub #VeerPunekarUpdates #ShapathvidhiCelebrations #PublicQuestions #LocalIssues #GovernmentFocus #MarathiPolitics #MaharashtraNews #BJPWorkers #CelebrationNews #CitizenQuestions #GandhiChowk #EventCoverage #PoliticalCelebration #TopMarathiNews #Shapathvidhi2024 #CMoath