Human Rights : मानवाधिकार व सामाजिक न्यायासाठी भव्य सोहळा आयोजित

Mahawani

१० डिसेंबर मानवाधिकार दिनी चंद्रपुरात प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती

१० डिसेंबर मानवाधिकार दिनी चंद्रपुरात प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती

चंद्रपूर :  मानवाधिकार एंव सामाजीक न्याय आयोग भारत,  Human Rights राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (ए.), व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचा कार्यक्रम चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता वरोरा नाका, प्रेस क्लब येथे संपन्न होईल.


कार्यक्रमाचे मान्यवर व वैशिष्ट्ये

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मानवाधिकार आयोगाच्या महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. रोशन दिप श्रीमाली भूषवतील. उद्घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व "डेली खबर"चे मुख्य संपादक मा. उमेश सिंह सोलंकी उपस्थित राहणार आहेत.


मुख्य अतिथी म्हणून चंद्रपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. रिना जनबंधु यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाला मार्गदर्शनासाठी "विदर्भ समाचार"चे संपादक व नामांकित विधिज्ञ मा. ॲड. फरहात बेग उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमात Rajura राजुरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील विविध पत्रकारांचा सत्कार


विशेष अतिथींचा सहभाग

कार्यक्रमात विदर्भ संपर्क प्रमुख मा. भोला गुप्ता, राष्ट्रीय प्रवक्ता मा. ग्यानेन्द्र विश्वास, दिव्यांग महिला आघाडी प्रमुख मा. कल्पना शिंदे, आणि सामाजिक कार्यकर्त्या मा. संगीता डाहुले हेही मान्यवर अतिथी म्हणून सहभागी होतील.


आयोजनाची जबाबदारी

कार्यक्रमाचे आयोजन मा. संजय रामटेके (राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन, अध्यक्ष- महाराष्ट्र पत्रकार संघ राजुरा). मा. सरिता मालु (राज्य सचिव, मानवाधिकार एंव सामाजीक न्याय आयोग भारत), मा. मुन्ना खेडकर (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ, चंद्रपूर), व  यांनी केले आहे. संचालनाची जबाबदारी मा. आदित्य भाके आणि मा. मिताली रामटेके यांच्याकडे देण्यात आली आहे. Human Rights


मानवाधिकार आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित या भव्य कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, हा सोहळा मानवाधिकार जागरूकतेचा संदेश देणारा ठरेल.


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #PressClubChandrapur #HumanRightsDay #SocialJusticeIndia #MarathiEvents #RightsAndJustice #HumanRights2024 #PressAssociation #SocialJusticeMovement #ChandrapurNews #RajuraUpdates #MaharashtraJournalists #MahawaniNewsEvents #RightsAwareness #JusticeForAll #InternationalHumanRightsDay #ChandrapurEvents #RajuraUpdates2024 #VeerPunekarUpdates #HumanRightsCelebration #SocialJusticePrograms #MarathiHumanRightsNews #RightsDayIndia #JournalistUnion #SocialJusticeUnion #MahawaniNewsHubUpdates #HumanRightsCeremony #MarathiJournalism #RajuraCeremonies #ChandrapurSpecialEvents #RightsDay2024 #RajuraHighlights #PressClubEvents #MahawaniEvents #MarathiJournalistUnion #HumanRights

To Top