राजुरा : कढोली (बु.), बाबापुर परिसरात मोठ्या प्रमाणात Illegal Sand वाळू उत्खनन सर्रास सुरू. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बेकायदा कृत्याने जोर धरला असून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहे.
या परिसरातील नदी पात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून दिवसाढवळ्या वाळूची वाहतूक सुरू आहे. जड वाहने वाळूने भरलेली असूनही कोणतीही तपासणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. स्थानिकांनी या प्रकाराबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून कढोली (बु.) हे तलाठी साज असून तलाठी सौ. शीला भोईर (प्रभारी) सदर क्षेत्रात अमावश्या - पौर्णिमेलाच दिसतात असेही स्थानिक बोलत आहे.
त्यानुसार, वाळू उत्खननाच्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे फावले आहे. या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होऊन भूगर्भ जलस्तर घटण्याची शक्यता आहे. शिवाय, अवैध वाळू उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होत आहेत.
अशा प्रकारच्या बेकायदा उत्खननामुळे परिसरातील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांना देखील हानी पोहोचत आहे. वाहतुकीसाठी जड वाहनांचा उपयोग होत असल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
वाळू उत्खनन हि दिवसोन दिवस मोठी समस्या बनत चालली आहे. वाळू माफियांचा प्रशासनावर प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. नियमांची पायमल्ली करून वाळू उपसा सुरू असल्याने पर्यावरणासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. जलस्रोतांचे रक्षण आणि नैसर्गिक संपत्तीची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र, सदर प्रकार पाहता प्रशासन पूर्णतः निष्क्रीय असल्याचे दिसत आहे.
बाबापुर, कढोली, चार्ली, निर्ली परिसरातील रहिवाशांना या समस्येचा मोठा फटका बसत असून त्यांनी अनेक वेळा निदर्शने केली आहेत. असे असतानाही प्रशासन केवळ आश्वासनांवर तोडगा काढत आहे.
हे वाचा: कंत्राटदाराच्या गलथान कारभाराचा अमलनाला पर्यटन केंद्राला फटका
अवैध वाळू उत्खननाच्या या प्रकारामुळे पर्यावरण हानीसह नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. प्रशासनाने याबाबत तत्काळ पावले उचलून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
कढोली (बु.), चार्ली, बाबापुर परिसरातील वाळू उत्खननाचा प्रश्न गंभीर बनत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर भविष्यात या ठिकाणी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. यासाठी स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Rajura #Chandrapur #IllegalSandMining #EnvironmentalIssue #SandMafia #Babapur #RajuraTaluka #ChandrapurDistrict #RiverMining #SandExtraction #EnvironmentalDamage #RajuraNews #ChandrapurNews #IllegalMining #SandSmuggling #StopSandMining #SaveEnvironment #RajuraTalukaNews #BabapurNews #IllegalActivity #EnvironmentalThreats #VeerPunekarNews #LocalNews #EnvironmentalAwareness #BreakingNews #RiverPollution #RajuraDistrictNews #ChandrapurUpdate #MaharashtraNews #MahawaniReport #ActionNeeded #SandMiningIssue #StopIllegalMining #EnvironmentalCrisis #SandMafiaNews