चार अल्पवयीन आरोपींना अटक
चंद्रपूर | शहरात दिनांक ३ जानेवारी रोजी एका १७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या Brutal Murder करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव तन्मय खान असून तो बाबूपेठ येथील रहिवासी होता. हत्येच्या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली होती परंतु चौथा आरोपी पसार झाला होता ज्यात पसार आरोपीला अटककरण्यात चंद्रपूर पोलिसाला यश आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, तन्मय हा नातेवाईकाला बसस्थानकावर सोडून घराकडे परतत असताना त्याच्या दुचाकीने वाटेत काही अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला धक्का लागला. यामुळे चिडलेल्या चार मुलांनी तन्मयसोबत वाद घातला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की बाबूपेठ रेल्वे फाटकाजवळील पटरीच्या परिसरात आरोपींनी तन्मयला आणखी जबरदस्त मारहाण केली. या वेळी त्यांनी निर्दयतेने दगडांचा वापर करून तन्मयची हत्या केली. हत्येची क्रूरता एवढी होती की तन्मयचा चेहरादेखील ओळखणे कठीण झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सौ. प्रभावती इकूरके यांच्या मार्गदर्शन खाली चंद्रपूर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र चौथा आरोपी पसार झाल्याने पोलिसांच्या हाताला लागला नवहता ज्याने चंद्रपूर पोलिसाने मोठ्या पातळीवर चौथ्या आरोपीचा शोध घेतला ज्यात चंद्रपूर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान सांगितले की, हत्येचे नेमके कारण सध्या अस्पष्ट आहे आणि यासाठी पुढील तपास सुरू आहे. या निघृण हत्येने Brutal Murder बाबूपेठ आणि परिसरातील नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. स्थानिकांनी अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीवर रोख घालण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई:
पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम ३०२ (हत्या), ३४ (सामूहिक गुन्हा) तसेच अन्य संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
शासन व प्रशासनाला प्रश्न:
- अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारीची प्रवृत्ती रोखण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाईल?
- गुन्हेगारांसाठी पुनर्वसन आणि सुधारणा प्रक्रिया कशी प्रभावीपणे राबवली जाईल?
- सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रशासनाकडून कोणते पाऊल उचलले जाईल?
तणावपूर्ण वातावरण:
या घटनेमुळे बाबूपेठ भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या निघृण हत्येने Brutal Murder समाजात खळबळ उडवली असून अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. शासन आणि प्रशासनाने त्वरित कार्यवाही करीत कठोर कायदे राबवणे अत्यावश्यक आहे. दोषींना कठोर शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय देणे हीच समाजाची अपेक्षा आहे.
#Mahawani #Mahawani-News #Chandrapur-News #Teen-Murder #Crime-News #Murder-Investigation #Chandrapur-Crime #Justice-For-Victim #Youth-Crime #Bapupeth-Murder #Police-Action #Crime-Report #Indian-Penal-Code #Breaking-News #Local-Crime #Chandrapur-Updates #Marathi-News #Social-Impact #Law-And-Order #Public-Safety #Brutal-Murder #Teen-Crime #Justice-Prevails #Police-Success #Criminal-Investigation #Youth-Safety #Crime-Awareness #Stop-Violence #Crime-Prevention #Community-Safety #Police-Efforts #Violence-Against-Youth #Victim-Justice #Local-News #Crime-Alert #Chandrapur-Police #Crime-Control #Law-Enforcement #Stop-Crime #Murder-Case #Brutal-Murder