Illegal Sand Mining | रामपूर परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

Mahawani

Illegal Sand Mining | Action taken against illegal sand transportation in Rampur area

तलाठ्यांच्या धाडीत ३ ट्रॅक्टर जप्त

राजुरा | तालुक्यातील रामपूर (सास्ती) परिसरात आज पहाटे १:०० वाजता अवैध रेती Illegal Sand Mining वाहतुकीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरना तलाठी पथकाने जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध रेती माफियांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरपैकी अमर वाघाडे यांच्या मालकीचे वाहन (MH-34-BV-0131), देवाजी येवले यांच्या मालकीचे वाहन (MH-34-AB-7641), व प्रमोद आसुटकर यांच्या मालकीचे वाहन (MH-34-CD-9545) आहेत. या वाहनांचे चालक अनुक्रमे विजय नीळकंठ मडावी, असिफ शेख, आणि प्रमोद आसुटकर होते. तलाठ्यांचे पथक, ज्यात बापूजी गेडाम, भीमराव सावले, आणि प्रतीक भोसरे यांचा समावेश होता, त्यांनी ही धाड टाकून तिन्ही वाहन तहसील कार्यालय, राजुरा येथे जमा केली. प्रशासनाने याप्रकरणी पुढील कारवाई सुरू केली आहे.


रामपूर परिसरात अवैध रेती Illegal Sand Mining वाहतुकीचे प्रमाण यापूर्वीही अनेकदा आढळले आहे. एका प्रकरणात, चालत्या रेती भरलेल्या (ट्रॅक्टर) वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने एक कामगार ठार झाला होता. या घटनेने परिसरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तरीदेखील रेती माफियांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यरात्रीच्या वेळी अशा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणि डंपरचा वापर होत असल्याचे दिसते. यामागे राजकीय आश्रय आणि प्रशासनातील काही व्यक्तींचे सहकार्य असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जातो.


     


तहसील कार्यालयाच्या नेतृत्वाखाली तलाठ्यांच्या पथकाने केलेली ही कारवाई Illegal Sand Mining महत्त्वाची मानली जात आहे. तथापि, या कारवाईनंतर रेती माफियांचा दबाव येऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. कारवाईच्या पुढील टप्प्यात कडक धोरण राबवून रेती तस्करांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. मात्र आजच्या कारवाईत तहसील प्रशासनाने स्वतःवर गालबोट लावण्याचे काम केले आहे. सदरची कारवाई पहाटे १:०० वाजताच्या सुमारास होऊन सदर प्रकरणाची माहिती स्थानिक पत्रकारांना देण्यात आली नाही. कारवाई पथकात सहभागी असलेले तलाठी बापूजी गेडाम यांच्याशी "महावाणीने" संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तलाठी यांच्या कडून उडवा उडवीचे उत्तर आले. तलाठी यांनी सांगितले कि, सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती माझ्या कडे नाही ती माहिती मी तहसील कार्यालय, राजुरा येथे कार्यरत अहवाल कारकून सौ. गंगा रामटेके (सोनटक्के) यांचा कडे सुपूर्त केली आहे. जेव्हा कि तलाठी पथकात सहभागी होते. तलाठी यांनी सांगितल्या प्रमाणे सोनटक्के मॅडम यांचा कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता "साहेबांच्या परवानगी विना माहिती देऊ शकत नाही" असे सांगण्यात आले. जेव्हा कि, कारवाई अहवाल (जप्तीनामा) देण्यात कसलीही गोपनीयता राखण्याची आवश्यता नसताना मॅडम कडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे चित्र दिसून आले. कारवाई पहाटे ०१:०० वाजता झाली मात्र माहिती मिळण्या करण्या करिता संध्याकाळचे ०७:०० वाजले. त्यातही सुरवातीला मॅडमने अर्धवट दिशाभूल करणारी माहिती दिली. याने संबंधित कर्मचाऱ्यावर संशय निर्माण होत आहे. सूत्राच्या माहिती नुसार नागरिकांकडून मॅडम संधर्भात या आधीही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 


IPC कलमे लागू होण्याची शक्यता:

अवैध वाहतुकीसाठी Illegal Sand Mining भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत विविध कलमे लागू होऊ शकतात. कलम ३७९ (चोरीसाठी शिक्षा), कलम १८८ (सरकारी आदेशाचे उल्लंघन), आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कलमांचा समावेश होऊ शकतो. रामपूर व आसपासच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात. ट्रॅक्टर जप्त करणे हा तात्पुरता उपाय असून यामागील मुख्य सूत्रधारांवर कारवाई झाली पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध रेती वाहतूक हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील गंभीर प्रश्न आहे. यामुळे केवळ पर्यावरणीय हानी होत नाही, तर स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हताही कमी होते. रेती तस्करीला रोखण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.


रामपूरमधील ही कारवाई नूतन वर्षात प्रशासनासाठी चांगली सुरुवात ठरू शकते, परंतु ती अंतिम पायरी ठरू नये. रेती माफियांवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी तांत्रिक उपाययोजना, सुसज्ज पथक, आणि स्थायिक चौकशी समित्यांची स्थापना होणे गरजेचे आहे. आजच्या कारवाईने प्रशासनाची कार्यक्षमता दाखवली असली, तरी रेती तस्करी रोखण्यासाठी अधिक कठोर धोरणांची गरज आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि कठोर कायद्यांच्या अंमलबजावणीनेच हा प्रश्न सोडवता येईल. अवैध रेती Illegal Sand Mining वाहतुकीविरुद्ध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असला, तरी या प्रकरणात मुख्य सूत्रधार आणि माफियांना अद्याप शिक्षा झालेली नाही. पर्यावरण संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी अशा कारवाया अधिक प्रभावीपणे होणे अत्यावश्यक आहे.


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #IllegalSandMining #RampurNews #MaharashtraNews #SandMafia #EnvironmentalDamage #SandSmuggling #Rajura #TehsilAction #ChandrapurNews #RampurUpdates #BreakingNews #NewsToday #SandTransport #IllegalActivities #IndianLaw #Maharashtra #EnvironmentProtection #MiningMafia #LocalNews #Journalism #SocialJustice #LegalNews #CrimeNews #CurrentAffairs #SandSmugglingIndia #SandMiningMafia #LawAndOrder #EnvironmentConservation #NewsInMarathi #RampurLatest #BreakingUpdates #TopNews #LocalReports #SandSeizure #TalathiAction #MafiaCrackdown #IllegalMiningIssues #MaharashtraUpdate #SandMafiaNews #JusticeSystem #IllegalSandMining #RampurSeizure

To Top