श्री बुध्दा कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांचा उफाळला संताप
राजुरा | तालुक्यात गोवरी ग्रामपंचायत, शिवसेना (उबाठा) व एचएमएस कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने श्री बुध्दा मिट्टी कंपनीविरोधात ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. Local Employment स्थानिक बेरोजगारांना डावलून बाहेरील कामगारांना नोकरी देणाऱ्या आणि पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीविरोधात हा मोर्चा निघणार आहे. महा मिनरल माईनिंग (गुप्ता कोल वॉशरीज) येथून सुरुवात होणारा मोर्चा श्री बुध्दा कंपनीच्या मुख्यालयावर धडकणार आहे.
स्थानिकांच्या तक्रारीनुसार, वेकोलि कडून जमिनीचे अधिग्रहण केले जात असून शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला आणि Local Employment नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. शिवाय, ब्लास्टींगच्या धक्क्यांमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. "जमीन आमची, ब्लास्टींगचे धक्के आम्हाला, धूळ तुम्ही करता, प्रदूषण आम्हाला" हा कसला न्याय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येणार आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या:
- १) कंपनीने स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार द्यावा.
- २) बाहेरील कामगारांची पोलिस व्हेरिफिकेशन प्रक्रियेस पूर्णत्व आणावी. गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामगार असल्यास त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.
- ३) गोवरी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता कोणतेही काम कंपनीने सुरू करू नये.
- ४) अधिग्रहित जमिनींचा मोबदला आणि शेतकऱ्यांना नोकऱ्या देईपर्यंत कोणतीही यंत्रणा बसवू नये.
- ५) स्थानिक लोकांसाठी आवश्यक सुख-सुविधा पुरवाव्यात.
नेतेमंडळींचा पाठिंबा:
गोवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आशाताई बबन उरकुडे आणि शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख बबन नारायण उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. "नदी पलीकडे रोजगार आणि आम्ही Local Employment बेरोजगार," या परिस्थितीमुळे संतप्त झालेले स्थानिक युवक-युवती मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आंदोलनाची तयारी:
मोर्चात हजारोंच्या संख्येने आंदोलक हजर राहणार असून, सकाळी १० वाजेपर्यंत महा मिनरल माईनिंग कंपनी समोर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा फक्त रोजगारासाठी नसून, स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठीचा संघर्ष आहे. या मोर्चाद्वारे स्थानिक Local Employment लोकांनी, बेरोजगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. रोजगार, पर्यावरण रक्षण, आणि स्थानिक हक्कांचे रक्षण या तीन मुद्द्यांवर या आंदोलनाची बांधणी आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, कंपनीने गावकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करत केवळ नफ्याचा विचार केला आहे. श्री बुध्दा कंपनीविरोधात एल्गार मोर्चा स्थानिकांच्या असंतोषाचा कळस आहे. योग्य निर्णय घेतला नाही तर हा संघर्ष मोठ्या आंदोलनात रूपांतरित होईल. रोजगाराच्या आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या संघर्ष हक्क आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
#ElgarMorcha #ShivSena #HMSUnion #LocalEmployment #EmploymentRights #NavbuddhaCompany #GoveryGrampanchayat #MineralMining #EnvironmentalJustice #UnemploymentCrisis #YouthProtest #FarmersRights #IndustrialPollution #LocalYouth #RajuraTaluka #ProtestForJustice #BlastingImpact #IndustrialExploitation #WorkersRights #JobOpportunities #EnvironmentalProtection #UnfairPractices #EconomicEquality #RuralDevelopment #CommunitySupport #RightToEmployment #EmploymentForLocals #SocialJustice #ProtestAgainstNavbuddha #ChandrapurNews #MaharashtraNews #YouthUnrest #ShivSenaProtest #EmploymentIssues #LandCompensation #FarmerStruggle #PollutionControl #LocalIssues #IndustrialResponsibility #JobDemand #JusticeForFarmers #YouthParticipation #WorkerVerification #ProtestMarch #BerojgariMukti #LocalProtest #ElgarInRajura #EmploymentJustice #TrendingNews #LocalEmployment