Protest In Rajura | संविधान प्रेमींचा भव्य निषेध मोर्चा

Mahawani

Rajura taluka shaken by insult to Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाने हादरला राजुरा तालुका

राजुरा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या वादग्रस्त विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, तसेच परभणी येथे संविधानाच्या प्रतीची तोडफोड आणि पोलिस अत्याचारामुळे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ ३० डिसेंबर रोजी राजुरा Rajura तालुक्यातील संविधान प्रेमी आणि बहुजन समाजाच्या नागरिकांनी निषेध कृती समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले. दि. १८ डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधान चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या संदर्भात केलेल्या अपशब्दांमुळे संविधान प्रेमी आणि बहुजन समाजामध्ये संतापाची लाट उसळली. डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे, असे मत कृती समितीने व्यक्त केले. या विधानामुळे देशभरात असंतोष निर्माण Protest In Rajura झाला आहे, आणि या संदर्भात सरकारने तात्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.


परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बंद काचेत ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड करण्यात आली. ही घटना बहुजन समाजाच्या भावना दुखावणारी असून, संविधानाचा अपमान करणारी Protest In Rajura आहे. विशेषतः, या घटनेनंतर पोलिसांनी निषेध व्यक्त करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेमुळे संविधान प्रेमींच्या रोषाचा आगडोंब उसळला आहे.


     


राजुरातील भव्य मोर्चा

राजुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संविधान चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व निषेध Protest In Rajura कृती समितीचे सदस्य विजय जुलमे यांनी केले. या मोर्चात हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिलांपासून युवा वर्गाने सहभाग घेतला. मोर्चामध्ये संविधान वाचवा, लोकशाही जिंवंत ठेवा, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चात Protest In Rajura कृती समितीचे सदस्य सुरेश मेश्राम, भीमराव दुर्गे, रमेश नळे, प्रा. भगवान धोंगडे, प्रकाश शेंडे, सत्यपाल कातकर, नागोराव पडवेकर, किशोर रायपुरे, रुषी रायपुरे, मुरलीधर ताकसांडे, सचिदानंद रामटेके, प्रियाताई खाडे, ऍड. दीपक चटप, संघपाल देठे, असिफ सय्यद यांच्यासह तालुक्यातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. विजय जुलमे यांनी या आंदोलनादरम्यान सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. अमित शहा Amit Shah यांनी संसदेत माफी मागावी आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी."


शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

परभणीतील घटनेनंतर प्रशासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त करत कृती समितीने प्रशासनाची भूमिका निष्क्रिय असल्याचे म्हटले. संविधानाच्या प्रतीची तोडफोड करणे आणि निषेध Protest In Rajura करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणे हे घटनात्मक लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लोकशाहीच्या संरक्षणासाठी जनजागृती मोर्चाच्या Protest In Rajura माध्यमातून जनतेमध्ये संविधानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान हा भारतीय लोकशाहीचा गाभा असून त्याचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. महिलांचा मोठा सहभाग या आंदोलनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली.


भविष्यातील कृतीची घोषणा

कृती समितीने यावेळी स्पष्ट केले की, जर या घटनांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर भविष्यात या आंदोलनाचा टोकाचा पवित्रा घेतला जाईल. दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी ठाम भूमिका समितीने व्यक्त केली.


वाचा: Congress Protests | डॉ. आंबेडकरांच्या सन्मानात काँग्रेसचा मोर्चा


समाजातील संतप्त भावना आणि प्रशासनाचे आव्हान

या आंदोलनाने Protest In Rajura एक गोष्ट स्पष्ट केली की, संविधानाच्या अपमानाबाबत समाज जागृत आहे. प्रशासनाने या घटना गांभीर्याने न घेतल्यास त्याचे दुष्परिणाम भविष्यात पाहायला मिळू शकतात. राजुरा तालुक्यातून उमटलेली ही संतप्त लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असून, सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आणि परभणीतील घटना यामुळे संविधान प्रेमी, बहुजन समाज आणि लोकशाही विचारसरणीचे नागरिक एकवटले आहेत. या आंदोलनाने प्रशासन व शासनाला धक्का देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. Protest In Rajura ही चळवळ फक्त राजुरा पुरती मर्यादित राहणार नाही, तर देशभरात संविधानाच्या रक्षणासाठी एक प्रभावी चळवळ म्हणून उभी राहण्याची शक्यता आहे. राजुरातील या आंदोलनातून Protest In Rajura एकच संदेश स्पष्ट झाला आहे - संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. सरकारने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अशा आंदोलनांचे रूपांतर मोठ्या क्रांतीत होऊ शकते. 


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #VeerPunekar #MarathiNews #DrAmbedkar #ConstitutionOfIndia #RajuraProtest #AmitShahControversy #BahujanSamaj #SocialJustice #ConstitutionDay #HumanRights #AmbedkariteMovement #PoliceBrutality #ParbhaniIncident #IndianDemocracy #SocialEquality #ProtestMarch #AmbedkarRespect #FreedomOfSpeech #RuleOfLaw #JusticeForAll #DemocraticIndia #SaveConstitution #RajuraMovement #EqualRights #SocialAwakening #AmbedkarFollowers #JusticeDemand #DalitRights #BahujanUnity #IndianPolitics #CivilRightsMovement #CivicProtests #SocialMovements #RajuraNews #ChandrapurNews #PoliticalProtests #HumanRightsViolation #SocialChange #PublicAwareness #ProtestForJustice #EqualityMovement #DemocraticRights #AmbedkarLegacy #ConstitutionalValues 

To Top