नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर सवाल
सावली | मानकापूर येथील शेतकरी प्रभाकर विस्तारी वेटे (वय ५२ वर्षे) यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला Tiger Attack केल्याची घटना काल १३ दुपारी २:०० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना सावली Saoli तालुक्यातील चारगाव बिटाच्या रिंगदेव तलावाजवळील कक्ष क्र. ३०२ येथील जंगलात घडली. स्थानिकांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने पडकाढला; सुदैवाने इसमाचा प्राण वाचला, मात्र वाघाच्या जोरदार हल्ल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर टांगला गेला आहे. शेतकरी आपल्या बैल आणि पाळीव जनावरांसोबत चराईसाठी जंगलात गेले असता, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रभाकर वेटे Prabhakar Vete यांना मानेवर खोल जखमा आणि छातीवर वाघाच्या पंजाच्या गंभीर खुणा आहेत. त्यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये Tiger Attack भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा ठावठिकाणा अद्याप निश्चित केला नाही, ज्यामुळे भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “आम्ही जंगलाच्या सीमेलगत राहतो; वाघाच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत,” असे एका गावकऱ्याने सांगितले. "वन विभाग केवळ हल्ल्यानंतर घटनास्थळी येतो; तोपर्यंत वाघ पुन्हा जंगलात नाहीसा होतो," अशी संतप्त प्रतिक्रिया मिळाली.
तातडीच्या उपाययोजनांची गरज
वन विभागाने Tiger Attack जखमी प्रभाकर वेटे यांना तातडीने ₹१०,००० आर्थिक मदत दिली, मात्र नागरिक यावर नाराज आहेत. “आमच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावकरी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना म्हणतात की, “प्रत्येक वेळी घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी फक्त कागदोपत्री मदत दाखवतात, मात्र मूलभूत समस्या सोडवण्यास ते अपयशी ठरले आहेत.”
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत
तालुक्यातील चारगाव बिट आणि मानकापूर परिसरात वाघाचे सतत दर्शन होत असल्याची माहिती आहे. रिंगदेव तलाव परिसरात जनावरांना घेऊन जाणे धोकादायक Tiger Attack ठरू लागले आहे. यामुळे शेतकरी आपली चराई बंद करावी का? असा सवाल करत आहेत. वन विभागाने या वाघाला जेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. “आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवताना देखील काळजीत असतो,” असे एका गावकऱ्याने सांगितले.
प्रशासनाला सडेतोड प्रश्न
वन विभागाच्या प्राथमिक चौकशी नंतर पर्यावरण आणि मानवी जीवन Tiger Attack यामध्ये समतोल राखण्याच्या दृष्टीने कोणते उपाय केले जाणार आहेत? हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. वन विभाग फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित का?
- वाघाला जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना का केल्या जात नाहीत?
- जंगलालगतच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली आहेत का?
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजले जातील का?
नागरिकांची मागणी
परिसरातील लोकांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
- जंगलालगतच्या गावांमध्ये संरक्षक कुंपण उभारावे.
- रात्रपाळीतील गस्त वाढवावी.
- वन विभागाने हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी तातडीने पथक तैनात करावे.
- पीडित शेतकऱ्याला अधिक आर्थिक मदत आणि विमा सुरक्षा द्यावी.
घटनास्थळी मदत करणारे अधिकारी
सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम, वनरक्षक विकास उईके आणि आखाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. वन विभाग आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे Tiger Attack नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. असे हल्ले पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे. शासनाने लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताच कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
#TigerAttack #RajuraNews #SavaliUpdates #ForestDepartment #WildlifeConflict #RajuraSafety #MarathiNews #AnimalAttacks #ForestConservation #HumanWildlifeConflict #SavaliNews #RajuraUpdates #TigerConservation #SavaliSafety #JungleSafety #WildlifeAwareness #MarathiUpdates #TigerHumanConflict #ForestManagement #RajuraTigerAttack #VillagersSafety #WildlifeProtection #SavaliTigerAttack #MarathiForestNews #RajuraVillagersDemand #WildlifePrecautions #MarathiVillagers #RajuraWildlife #SafetyMeasuresRajura #SavaliForestNews #TigerThreatRajura #MarathiSafety #WildlifeActionPlan #RajuraUpdates2025 #ForestDeptAccountability #WildlifeSafetyMeasures #VillagersFear #RajuraEmergency #TigerAttackPrecautions #RajuraProtests #MarathiForestDepartment #VillagerDemandsRajura #RajuraBlogUpdates #SavaliBlogNews #RajuraTigerUpdates #ForestDeptSavali #VillagersSafetyRajura