खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आक्रमक इशारा, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सहन करणार नाही
चंद्रपूर | चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज Electricity for Farmers जोडणीसाठी महावितरण आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. २०१८ पासून शेतकऱ्यांकडून घेतलेल्या सुरक्षारकमेवर व्याज द्या अथवा त्वरित वीज जोडणी द्या, अन्यथा शेतकऱ्यांसह महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील तब्बल १५९० शेतकऱ्यांनी २०१८ पासून कृषी पंपांसाठी अर्ज केले होते. त्यासाठी महावितरणने सुरक्षारक्कम घेतली मात्र Electricity for Farmers अद्याप वीज जोडणी दिलेली नाही. शेतीसाठी अवलंबून असलेल्या या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशातच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सरकारला जाहीर इशारा देत वीज जोडणीसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.
धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेले स्मरणपत्र⬇
महावितरणकडून Electricity for Farmers घरगुती ग्राहकांकडून विज बिल भरण्यास उशीर झाला तर व्याज आकारले जाते. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच धोरण का नाही? असा सवाल धानोरकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या सुरक्षारकमेवर सरकारने व्याज का दिले नाही? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेतही उपस्थित केली आहे.
IPC कलम | तपशील |
---|---|
कलम 420 (फसवणूक) | शेतकऱ्यांकडून पैसे घेऊनही सेवा दिली जात नसेल, तर ही फसवणूक ठरू शकते. |
कलम 406 (विश्वासघात) | शेतकऱ्यांचे पैसे घेतले तरी सेवा न दिल्यास हे विश्वासघाताचे प्रकरण ठरू शकते. |
शासन आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होते. २०१८ पासून कृषी पंपांसाठी अर्ज करूनही त्यांना Electricity for Farmers वीज जोडणी मिळालेली नाही. शेतकऱ्यांना दरवर्षी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो, त्यातच वीज न मिळाल्याने सिंचनावर परिणाम होत आहे. सरकारने जलसंधारणाच्या योजना जाहीर केल्या, मात्र शेतीला वीजच नसेल, तर त्या योजनांचा उपयोग काय?
सरकार आणि महावितरण यांनी त्वरित कारवाई करत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. जर Electricity for Farmers वीज जोडणी लवकर न दिली, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी नागरिकांचीही भावना आहे. सतत सरकारकडे पत्रव्यवहार करूनही जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील, तर याचा अर्थ सरकारी यंत्रणा कुचकामी झाली आहे. प्रशासनाने जागे होऊन त्वरित योग्य पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्यास मोठे आंदोलन उभे राहू शकते.
Why are farmers in Chandrapur protesting against MSEB?
What is the demand of MP Pratibha Dhanorkar regarding electricity?
How long have farmers been waiting for electricity connections?
What legal actions can be taken against MSEB for delaying electricity supply?
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #PratibhaDhanorkar #ElectricityForFarmers #MSEB #FarmerRights #MaharashtraPolitics #AgricultureCrisis #SaveFarmers #ElectricityIssue #ChandrapurFarmers #FarmersProtest #AgriculturalPolicy #ElectricityForAll #FarmersFirst #GovernmentNegligence #FarmersStruggle #RuralDevelopment #ElectricityCrisis #MarathiJournalism #BreakingNewsIndia #VidarbhaNews #ChandrapurUpdates #MaharashtraNews #AgricultureProblems #ElectricityBill #FarmerProtestIndia #FarmersDemands #PowerSupply #RuralElectricity #ElectricityIssues #MahaVitaran #NewsUpdate #PublicRights #SocialJustice #PoliticalNews #IndianFarmers #LatestNews #ViralNews #TrendingNow #FarmersMovement #SupportFarmers #EnergySector #GovernmentPolicy #IndiaNews #ElectricityforFarmers