पोलिसांना मिळत होते हजारोंचे हप्ते?
राजुरा | वर्धा नदीच्या कोलगाव घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर नवीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घणाघाती कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केल्याने Illegal Sand Mining Chandrapur रेती तस्करांच्या गटांमध्ये खळबळ माजली आहे. "पोलिसांना दिलेले हप्ते वाया गेले," अशी चर्चा तस्करांमध्ये सुरू असून, आतापर्यंत पोलिसांना हप्ते देऊन धंदा सुरळीत चालवणाऱ्या टोळ्यांचे चक्र बिघडले आहे.
२१ फेब्रुवारीच्या रात्री कोलगाव घाटावरून Illegal Sand Mining Chandrapur अवैध रेती उत्खनन करून तीन ट्रॅक्टर मौजा सास्ती गावाच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळताच, नवीन प्रभारी IPS पोलीस अधिकारी, राजुरा अनिकेत हिरडे Aniket Hirde यांच्या नेतृत्वात तातडीने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २४.१२ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला. जो खालील प्रमाणे आहे.
क्रमांक | मुद्देमाल | अंदाजे किंमत (₹) |
---|---|---|
१ | ट्रॅक्टर (MH34 A5050) आणि ट्रॉली | ८,००,०००/- |
२ | ट्रॅक्टर (MH34 CJ6104) आणि ट्रॉली (MH34 BF9826) | ८,००,०००/- |
३ | ट्रॅक्टर (MH34 BV4943) आणि ट्रॉली (MH34 BV4915) | ८,००,०००/- |
४ | अडीच ब्रास रेती | १२,५००/- |
एकूण जप्त रक्कम | २४,१२,५००/- |
सदरची कारवाई झाल्याने रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, "नवीन अधिकाऱ्यांनी हफ्तेखोरी संपवली" असे रेती तस्करांकडून बोललेले जात आहे.
हप्ते देऊन व्यवसाय चालवणाऱ्यांचे दणाणले धाबे
प्राप्त माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून रेती तस्करांनी प्रति महिना हजारो रुपयांचे हप्ते देऊन अवैध धंदे सुरू ठेवले होते. करीता पोलिसांनी यापूर्वी कधीही मोठ्या प्रमाणात कारवाई केली नव्हती. Illegal Sand Mining Chandrapur मात्र, नवीन IPS अधिकारी आल्यापासून हप्तेखोरीला लगाम लागली असून, आता थेट मोठ्या कारवाया सुरू झाल्याने पोलीस स्टेशनला जप्त केलेले वाहन लावण्याची जागा देखील उरलेली नाही. त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🚨 गुन्हे दाखल: तस्करांना पोलिसांचा दणका 🚔
अरोपीचे नाव | वय (वर्षे) |
---|---|
मिलिंद अलोणे | ३२ |
महेंद्र उपरे | ५० |
राजकुमार मरई | २२ |
दिलीप नरड | ५४ |
महेंद्र मरस्कोल्हे | ३४ |
रमेश येल्ला | ५० |
लावण्यात आलेली गुन्हेगारी कलमे:
- कलम ३०३ (२) भा.दं.वि.
- कलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६
- कलम २१ (१) (२) (३) गौण खनिज अधिनियम-१९५२
- कलम १३० (१)/१७७, ५० मोटार वाहन कायदा
या सर्वांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नवीन IPS अधिकाऱ्यांचा धसका
या कारवाईमुळे रेती माफियांना Illegal Sand Mining Chandrapur नवीन अधिकाऱ्यांचा धसका बसला आहे. आतापर्यंत पोलिसांना हफ्ते देऊन काही तस्कर बिनधास्तपणे व्यवसाय करत होते, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता कारवाई सुरू केल्याने, रेती तस्करांना चांगलीच धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांचा रोष: "प्रशासनाला कधी येणार जाग?"
गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा व इतर नद्यांतून अवैध उत्खनन सर्रास सुरू आहे. अवैध व्यवसायामुळे स्थानिक पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र, प्रशासन सतत डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. Illegal Sand Mining Chandrapur नदी खोदून खोदून संपवली जात असतानाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आता नवीन पोलीस अधिकारी आल्यावरच का ही कारवाई झाली? जुने अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत होते? असे प्रश्न नागरिक विचारात आहे. रेती तस्करीला आळा घालण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही. सरकारनेही कठोर धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भविष्यात आणखी कठोर कारवाया अपेक्षित
या प्रकरणामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना वाटते की, आता तरी Illegal Sand Mining Chandrapur रेती माफियांचे दिवस भरले. मात्र, काहीजण अजूनही शंका घेत आहेत की, "हे फक्त काही दिवसांचं नाटक आहे. पुन्हा सगळं पूर्ववत होईल." त्यामुळे प्रशासन भविष्यात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात रेती चोरी हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. हप्तेखोरीमुळे कायदा आणि व्यवस्था दुबळी झाली आहे. मात्र, नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी आल्यापासून सुरू केलेली ही कठोर कारवाई हा एक सकारात्मक बदल आहे. अधिकाऱ्यांनी जर या मोहिमेत सातत्य ठेवलं, Illegal Sand Mining Chandrapur तरच अवैध रेती तस्करीला पूर्णविराम लागू शकतो. नाहीतर पुन्हा "हप्ते द्या आणि धंदा करा" हे जुनेच चक्र सुरू होईल.
What action did Rajura police take against illegal sand mining?
Why is the sand mafia panicking after this police action?
What legal charges were filed against the accused?
Will this action put an end to illegal sand mining in Maharashtra?
#IllegalSandMining #SandMafia #MaharashtraPolice #RajuraCrime #PoliceAction #CrimeNews #Maharashtra #SandTheft #LawEnforcement #Corruption #SandMafiaArrested #EnvironmentalDamage #IllegalBusiness #PoliceRaid #MiningScam #BreakingNews #IllegalTrade #SaveRivers #JusticeForNature #MahawaniNews #TractorSeized #MaharashtraNews #CorruptSystem #NoMoreBribes #IllegalActivities #PoliceCrackdown #StopIllegalMining #RiverPollution #SandSmuggling #Mahawani #VeerPunekar #CriminalArrest #PoliceInvestigation #TruthJournalism #PoliceVsMafia #LawAndOrder #JusticeServed #PoliceSeizure #NewsUpdate #CorruptOfficials #SaveNature #RajuraUpdates #MiningMafia #GovernmentAction #PoliceAlert #IllegalExcavation #StrictAction #PoliceNews #MiningLaw #BreakingCrime #TrendingNews #PoliceCase #EnvironmentalAwareness #IllegalSandMiningChandrapur