नागरिकांचे मूलभूत आरोग्य हक्क पूर्ण होणार का?
चंद्रपूर | जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या आदिवासी बहुल जिवती तालुक्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात आवश्यक पदनिर्मितीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर, दि. १३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्रेणीवर्धित Jiwati Rural Hospital रुग्णालयांसाठी पदनिर्मितीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे जिवतीतील ग्रामीण रुग्णालयात १० नियमित पदे व १६ बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची पदे निर्माण होणार आहेत.
सदर रुग्णालयाची स्थापना शासन निर्णयानुसार १७ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली होती. मात्र, तब्बल दोन वर्षे पदनिर्मिती न झाल्यामुळे या Jiwati Rural Hospital रुग्णालयाचे स्वरूप केवळ इमारतीपुरते मर्यादित राहिले. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी महत्त्वाच्या पदांची अनुपलब्धता असल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने. गंभीर परिस्थितीत अनेकांना चंद्रपूर किंवा राजुराच्या रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. ही परिस्थिती टाळता आली असती, पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे हाल पदभरती पर्यंत सुरूच असणार आल्याचे दिसून येत आहे.
राजुरा Rajura विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी हिवाळी अधिवेशनात दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे जिवतीच्या Jiwati Rural Hospital रुग्णालयातील पदनिर्मितीची मागणी केली होती. त्यानंतर दोन महिन्यांत शासन निर्णय मंजूर झाला. ही सकारात्मक बाब असली तरी स्थानिक नागरिकांना स्वाभाविकच प्रश्न पडतो—ही प्रक्रिया इतक्या उशिरा का झाली?
लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष का? | |
---|---|
समस्या | तपशील |
सुसज्ज रुग्णवाहिका नाही | गंभीर रुग्णांना हलवण्यासाठी अद्याप पुरेश्या सुविधा नाहीत. |
औषधांचा तुटवडा | प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महत्त्वाची औषधे वेळेवर उपलब्ध नसतात. |
विशेष तज्ज्ञांचा अभाव | ग्रामीण भागात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ नाहीत. |
आरोग्य जनजागृतीचा अभाव | आदिवासी भागात कुपोषण, माता-बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी योजना राबविल्या जात नाहीत. |
आमदारांनी काय करायला हवे? |
---|
पदनिर्मितीसाठी इतका विलंब न होता हे काम तत्काळ मार्गी लावायला हवे होते. |
रुग्णालयासाठी आवश्यक वीसहून अधिक नियमित पदे निर्माण करण्याची मागणी सरकारदरबारी लावून धरायला हवी होती. |
केवळ अधिवेशनात विषय मांडून थांबण्याऐवजी प्रत्यक्ष आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करायला हवा होता. |
जिवतीमध्ये किमान २४x७ एमरजन्सी सुविधा असलेले हेल्थ सेंटर उभारण्यावर भर द्यायला हवा होता. |
निर्णय पुरेसा नाही, आणखी काय हवे?
फक्त पदनिर्मितीच्या निर्णयाने समस्या सुटणार नाही. या पदांची भरती कधी होणार? प्रक्रिया किती वेगाने पार पडणार? आणि नियुक्त Jiwati Rural Hospital अधिकाऱ्यांना योग्य सुविधा दिल्या जाणार का? हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. अन्यथा, केवळ कागदावर मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात पदे रिक्त राहतील, आणि नागरिकांचे हाल तसेच सुरू राहतील.
राजकीय घोषणांची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी!
सध्या झालेल्या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे, पण भविष्यात अशा मूलभूत गरजांसाठी लोकांनी संघर्ष करावा लागणार नाही, याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे. Jiwati Rural Hospital राजकीय नेता निवडणुकीच्या वेळी मोठं-मोठे आश्वासने देतो, पण त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीही लोकशाहीत जाब विचारायला हवा. जिवतीकरांसाठी ही लढाई अजून संपलेली नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
Why was the staff approval for Jiwati rural hospital delayed for so long?
How will the new staff positions improve healthcare in Jiwati?
What are the major healthcare challenges in Jiwati?
When will the government complete the recruitment process for these new positions?
#Jiwati #Chandrapur #HealthcareCrisis #RuralHealth #TribalWelfare #HospitalStaff #PublicHealth #GovernmentDecision #MaharashtraHealth #HealthForAll #MedicalFacilities #HealthReform #DoctorShortage #RuralDevelopment #HealthCareReform #MedicalStaffing #GovtApproval #JiwatiHospital #HealthcareChallenges #PublicWelfare #HealthCareIndia #MedicalAccess #RuralDoctors #GovtSupport #HospitalFunding #BetterHealthcare #RuralDoctorsNeeded #HealthRights #MedicalCrisis #TribalHealth #HealthcareIssues #HealthJustice #GovtPolicies #ChandrapurHealth #HealthUpdates #PrimaryCare #HospitalInfrastructure #HealthAndWellness #GovtInitiatives #DoctorAvailability #MedicalShortage #HospitalManagement #HealthSector #EmergencyCare #PatientRights #AffordableHealthcare #HospitalImprovement #JiwatiMedical #MaharashtraUpdates #LocalNews #Mahawani #MahawaniNews #VeerPunekar