Korpana Land Rights | जमीन वाचवण्यासाठी टेकाम परिवाराचा लढा

Mahawani
0

Citizens kicking and arguing for agriculture

वडिलोपार्जित जमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे दावा; टेकाम कुटुंबाचा कायदेशीर संघर्ष सुरू

कोरपणा | दि. १३: तालुक्यातील बाक्कडी व शिव बाक्कडी येथील सर्वे नंबर १२६ व १२७ ची वडिलोपार्जित जमीन Korpana Land Rights वाचवण्यासाठी टेकाम कुटुंबाने ठाम भूमिका घेतली आहे. तीन पिढ्यांपासून कसत असलेल्या या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप टेकाम परिवाराने केला आहे.


टेकाम कुटुंबाने सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे जमिनीची फेरफार नोंदणी करण्यात आली नव्हती. मात्र, खरी मालकी आमचीच आहे. आजवर या जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह केला असून, आता काही दलाल बनावट कागदपत्रांच्या आधारे Korpana Land Rights जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत.


कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने – टेकाम कुटुंबाचा दावा

टेकाम परिवाराने सांगितले की, कोर्टामध्ये हा वाद गेला असता न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही Korpana Land Rights जमीन बळकावण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, असा इशारा अर्जदारांनी दिला आहे.


नीलामीचा कट हाणून पाडण्याचा निर्धार

या जमिनीच्या नीलामीसाठी काही दलाल प्रयत्न करत असल्याचा आरोप करत टेकाम कुटुंबाने जमीन वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संदर्भात कोणत्याही खोट्या कागदपत्रांच्या आधारे Korpana Land Rights जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


"ही जमीन आमच्या वडीलोपार्जित हक्काची आहे. आम्ही तिचा मालकी हक्क कोणालाही देणार नाही. जर कुणी चुकीच्या मार्गाने ही Korpana Land Rights जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कायदेशीर मार्गाने त्याचा प्रतिकार करू. सत्यासाठी आम्ही अखेरपर्यंत लढत राहू!" असे टेकाम परिवाराने स्पष्ट केले आहे.


शेतकऱ्यांचा आवाज बुलंद

या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक शेतकरी समाजातही मोठी खळबळ उडाली असून, टेकाम कुटुंबाला पाठिंबा वाढत आहे. सत्य बाजूला असेल, तर न्याय मिळेल, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.


Why is the Tekam family fighting a legal battle?
The Tekam family is fighting to protect their ancestral land from being taken over using fraudulent documents.
What was the court’s verdict on the land dispute?
The court ruled in favor of the Tekam family, affirming their ownership of the land.
How are local farmers reacting to this dispute?
Local farmers are supporting the Tekam family, believing that justice will prevail in favor of the rightful owners.
Who is trying to claim the Tekam family’s land?
Some individuals and middlemen are allegedly trying to take ownership of the land using fake documents.


#LandDispute #LandRights #FarmersRights #LegalBattle #TekamFamily #KorpanaNews #LandOwnership #JusticeForFarmers #MaharashtraNews #RuralIssues #Agriculture #SaveFarmersLand #LandMafia #CourtVerdict #FakeDocuments #AncestralProperty #LandEncroachment #FarmersProtest #JusticePrevails #LandGrabbing #LegalRights #AgricultureNews #SaveOurLand #TribalRights #VillageNews #FakeLandRecords #LandScam #FightForJustice #IndianFarmers #JudiciarySupport #RightToProperty #LandProtection #SaveOurHeritage #CorruptionInLand #LandRightsMatter #StopIllegalLandGrabbing #SupportFarmers #TribalLandIssues #LandReforms #JusticeForTekam #FairTrial #FarmersStruggle #LegalFight #IndigenousRights #GrassrootsMovement #CourtDecision #StandWithFarmers #FakeClaims #SupportJustice #AgricultureCrisis #LandFraud #UnityForJustice #VillageIssues

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top