Warora Gambling | सट्टा पट्टी चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mahawani
6 minute read
0

Local Crime Branch Team, Chandrapur, taking action

वरोऱ्यात मोठी कारवाई: लाखोंचा मुद्देमाल जप्त

वरोरा | चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुर्दशन यांच्या आदेशानुसार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (LCS) वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या Warora Gambling सट्टा पट्टी व्यवसायावर छापा टाकून १२ जणांना अटक केली. या कारवाईत ४.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहितीदाराकडून कळाले की, वरोरा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा पट्टी सुरू आहे. Warora Gambling पोलिसांनी तत्काळ योजना आखून, वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनिल गौरकार आणि पोलीस स्टाफ यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये छापेमारी करत एकूण १२ जणांना अटक केली. या कारवाईत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींकडून रोख रक्कम: ₹२२,८२०, ८ मोटारसायकली: ₹४,००,०००, एकूण मुद्देमाल: ₹४,२२,८२० जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी वरोरा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सट्टा, जुगार, दारू, गांजा, गुटखा यांसारखे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी केल्या आहेत. पोलिसांनी अशा धंद्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम आखली असून, अनेक ठिकाणी छापे टाकण्याचे नियोजन सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुर्दशन यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, Warora Gambling अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत जिल्ह्यात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.


पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

पोलीस उपअधीक्षक रीना जनबंधु मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. Warora Gambling अवैध सट्टा पट्टी चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर अनेक बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या मते, वरोरा आणि आसपासच्या भागात अनेक ठिकाणी जुगार आणि सट्ट्याचा व्यवसाय सुरू असून, त्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी आणखी मोठ्या मोहिमा राबवण्यात येणार आहेत.


सट्टा आणि जुगार यांचा समाजावर परिणाम

सट्टा आणि जुगार यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. Warora Gambling सट्टा चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते. पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे, मात्र या पार्श्वभूमीवर राजकीय आश्रय असलेल्या मोठ्या मासे अजूनही मुक्तपणे फिरत आहेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


या कारवाईने वरोरा शहरात खळबळ उडाली असली तरी, हा फक्त सुरुवात आहे. पोलिसांनी सट्टा पट्टी आणि Warora Gambling अवैध धंद्यांच्या मुळावर पूर्णपणे घाव घालण्यासाठी मोठ्या पातळीवर तपास सुरू केला आहे. पुढील आठवड्यात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे. वरोरा शहराबरोबरच चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर या भागांमध्येही पोलिसांनी मोहीम हाती घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सट्टा आणि जुगार यांना कायमचे संपवण्यासाठी पोलिसांना आणखी कठोर पावले उचलावी लागतील. असे झाल्यासच गुन्हेगारीचा आलेख खालावेल आणि सामान्य नागरिक निर्भयपणे जगू शकतील.


What was the Warora gambling raid about?
Warora police raided illegal betting dens, arresting 12 accused and seizing ₹4.22 lakh.
How many cases were registered in the Warora police action?
A total of 11 cases were registered against the accused for illegal gambling operations.
What was the total amount seized in the Warora police raid?
The police confiscated ₹4.22 lakh in cash and vehicles during the operation.
Will there be more police actions against illegal gambling in Warora?
Yes, authorities have hinted at more crackdowns to curb organized crime in the region.


#Warora #CrimeNews #PoliceAction #GamblingRaid #IllegalBetting #MaharashtraPolice #BreakingNews #ChandrapurCrime #PoliceRaid #NewsUpdate #BettingScandal #CrimeAlert #PoliceInvestigation #WaroraUpdates #LocalCrime #CrimeReport #MaharashtraNews #WaroraPolice #GamblingCrackdown #IllegalActivities #CrimeControl #LawEnforcement #PoliceSuccess #JusticeForAll #PublicSafety #StopCrime #LegalAction #WaroraBreakingNews #IllegalBusiness #WaroraCity #TopNews #MaharashtraCrime #ChandrapurNews #WaroraArrests #OrganizedCrime #CrimePrevention #TrendingNews #WaroraUpdates #BettingMafia #IllegalOperations #CrimeFighter #LawAndOrder #PoliceSurveillance #CommunitySafety #GamblingLaws #ActionAgainstCrime #PoliceVictory #CrimeSpot #PoliceActionMaharashtra #AntiCrimeDrive #WaroraHeadlines

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top