मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय; क्रिकेट बेटिंगच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास सुरू
चंद्रपूर : शहरातील कस्तुरबा रोडवरील व्यंकटेश हॉटेलमध्ये ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरू Chandrapur Betting Racket असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तिघांना अटक केली. प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय व्यक्त केला जात आहे.
९ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल व्यंकटेश Venkatesh Hotel, Chandrapur येथे केलेल्या कारवाईत पारस उखाडे, अविनाश हांडे आणि राकेश कोंडावार या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून १.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल, पाच महागडे मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. Chandrapur Betting Racket आरोपी भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर allpanelexch.com, nice7777.fun आणि nice.45-tech या सट्टेबाजी वेबसाइट्सच्या माध्यमातून ऑनलाइन बेटिंग करत होते.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपींनी क्रिकेट बेटिंगसाठी ३८ वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केला, त्यापैकी काही खाती परराज्यातील असून सध्या ६० लाख रुपयांहून अधिक रक्कम गोठविण्यात आली आहे. Chandrapur Betting Racket याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रमांकांवर बेटिंग संदर्भात चॅटिंग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींवर कलम ४ आणि ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, तसेच कलम ४९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात ऑनलाइन सट्टेबाजीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन सट्टेबाजी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने बेटिंग माफियांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातही आपला विस्तार केला आहे. Chandrapur Betting Racket पोलिस तपासानुसार, यामध्ये केवळ स्थानिक लोकच नाही, तर नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांतील नागरिकही सामील असल्याचे आढळले आहे.
आरोपी हे याआधीही अशा प्रकरणात अडकले असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच, यामध्ये "बेनामी आर्थिक व्यवहार" आणि "बँकिंग फ्रॉड" चा मोठा मुद्दा उपस्थित होत आहे. पोलिसांनी गोठवलेली रक्कम हा फक्त एका टप्प्याचा तपास असून, यामागील संपूर्ण आर्थिक प्रवाह उघड करण्याची आवश्यकता आहे.
चंद्रपूरमध्ये सट्टेबाजीच्या वाढत्या प्रकरणांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. हे रॅकेट स्थानिक पातळीवर कार्यरत असले तरी याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय बेटिंग माफियांशी जोडले गेले आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. Chandrapur Betting Racket पोलिसांनी तातडीने आणखी मोठ्या कारवाया करून या साखळीचा पूर्ण छडा लावणे आवश्यक आहे.
या प्रकरणात आणखी कोणते महत्त्वाचे व्यक्ती किंवा आर्थिक स्रोत सामील आहेत, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. Chandrapur Betting Racket आर्थिक गुन्हे शाखेने यामध्ये समांतर तपास सुरू करावा आणि नागरिकांनीही अशा प्रकरणांमध्ये गुंतू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
What is the Chandrapur online betting scam?
How was the Chandrapur betting racket exposed?
Are there international links to this betting scam?
What actions have the police taken in this case?
#ChandrapurBettingScam #ChandrapurCrime #OnlineBetting #CricketScam #CyberCrime #IllegalGambling #PoliceRaid #BettingRacket #CrimeNews #MaharashtraPolice #Fraud #MoneyLaundering #CricketBetting #Busted #GamblingMafia #CyberFraud #IllegalActivities #ChandrapurNews #IndianCrime #DigitalFraud #BlackMoney #FinancialScam #BettingScam #Hawala #InternationalScam #IllegalTransactions #Underworld #IPLBetting #T20Scam #CriminalNetwork #NewsUpdate #CrimeAlert #CyberSecurity #FakeBankAccounts #Investigation #PoliceAction #OnlineCrime #ScamAlert #BreakingNews #Justice #IllegalWealth #FraudDetection #RiskAlert #SecurityBreach #FinancialCrime #GamingFraud #BannedActivities #SportsScandal #MatchFixing #LawEnforcement #MoneyScam #CrimeInvestigation