चंद्रपूर पोलिसांची कारवाई अट्टल गुन्हेगाराकडून लाखोंचा ऐवज जप्त
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातील एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून जवळपास १९.१० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. Chandrapur Burglary Arrest हा गुन्हेगार गेल्या २० वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असून, चंद्रपूर जिल्ह्यातील १२ घरफोड्यांची कबुली त्याने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक संशयित इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जात आहे.
त्यानुसार चंद्रपूर शहर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी सुरेश महादेव कामरे (वय ६०, रा. यवतमाळ) याला ताब्यात घेतले. Chandrapur Burglary Arrest त्याची झडती घेतल्यावर २,६१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले.
🚔 १२ घरफोड्यांची कबुली, लाखोंचा ऐवज हस्तगत
पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याने कबूल केलेले गुन्हे –
- भद्रावती – १ गुन्हा
- वरोरा – ३ गुन्हे
- सावली – १ गुन्हा
- मुल – १ गुन्हा
- तळोधी – ५ गुन्हे
- नागभीड – १ गुन्हा
याप्रमाणे एकूण १२ घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान त्याच्याकडून ₹१९,१०,०००/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
२० वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय
सुरेश महादेव कामरे हा गेल्या दोन दशकांपासून चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. Chandrapur Burglary Arrest तो अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता, मात्र पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे त्याला अटक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुट्टावार, दिपक डोंगरे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महंतो, पोअ प्रफुल्ल गारघाटे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बादामवार, अमोल सावे, चपोहवा दिनेश अराडे व मिलींद टेकाम यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. Chandrapur Burglary Arrest
गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांची वचक
चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी हा मोठा प्रहार केला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास देखील करण्यात येत आहे.
चंद्रपूर पोलिसांच्या या वेळी योग्य नियोजनाने राबवलेल्या कारवाईमुळे घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांची वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
What is the recent burglary case in Chandrapur?
How many burglary cases did the arrested criminal confess to?
How did Chandrapur police track the burglar?
What actions are being taken against the burglar?
#Chandrapurburglaryarrest #ChandrapurPolice #BurglaryCase #CrimeNews #GoldTheft #PoliceArrest #CriminalCaught #CrimeReport #PoliceAction #BreakingNews #TheftCase #StolenGold #Burglary #CrimeAlert #ChandrapurNews #PoliceInvestigation #JusticeServed #CrimeScene #LawAndOrder #MaharashtraPolice #CrimeFighter #CrimeWatch #SafetyFirst #CrimeUpdate #NewsAlert #GoldJewelry #StolenJewelry #CaughtRedHanded #CrimeBusting #JusticePrevails #MaharashtraNews #LocalNews #NewsToday #BurglarySolved #PoliceCase #CriminalInvestigation #PoliceTracking #RobberyCase #CrimeStories #GoldSmuggling #CriminalNews #TopNews #BreakingUpdates #NewsNow #LegalNews #BurglaryCrime #CrimeControl #LawEnforcement #TrendingNews #CrimeTracker #CaughtByPolice #CrimeStopper #BurglaryArrest #ChandrapurBurglaryArrest #ChandrapurNews #MahawaniNews