कायद्याचा संपला धाक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यांत गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने, अवैध धंद्यांना अभय मिळाले आहे. Chandrapur Crime Surge या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत, केंद्रीय गृह विभागाच्या सहकार्याने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. दिवसा ढवळ्या खून, गोळीबार, दरोडे, गँगवार यासारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. Chandrapur Crime Surge दुर्गापूर, राजुरा आणि बल्लारपूर येथे घडलेल्या हत्याकांडांमधून प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला नाही. नुकतेच एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरावर सर्रास गोळीबार झाला, यावरून गुन्हेगार किती बिनधास्त झाले आहेत, हे स्पष्ट होते.
याशिवाय, शहराच्या विविध भागांत मटका-जुगार, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखू, अमली पदार्थ, क्रिकेट सट्टा, कोंबडा बाजार, अवैध रेती तस्करी, सावकारी हे धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. Chandrapur Crime Surge या व्यवसायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत असून, अनेक युवक या गर्तेत ओढले जात आहेत.
पोलीस फक्त सामान्यांना त्रास देण्यात मग्न
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांची भूमिका संशयास्पद बनली आहे. गुन्हेगार शहरात दहशत पसरवत असताना, पोलीस मात्र वाहतूक कारवाई आणि किरकोळ वाद सोडवण्यातच गुंतले आहेत. Chandrapur Crime Surge अनेक अवैध धंदे पोलीस ठाण्यांच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू आहेत, तरीही त्यावर कारवाई होत नाही.
वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत अवैध वाहतूक सुरू असून, ते फक्त दुचाकीस्वारांना दंड करण्यापुरतेच सक्रिय आहेत. अनेक पोलीस कर्मचारी गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी, त्यांच्या अभयदाता बनल्याची चर्चा आहे.
गुन्हेगारीला अभयदान कोण देत आहे?
गुन्हेगारी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी वाढली, हा अभ्यासाचा विषय आहे. कोणाचा आशिर्वाद असल्याशिवाय कोळसा, रेती, खनिज संपत्ती, लाकडाची अवैध तस्करी अशा मोठ्या प्रमाणात सुरू राहू शकत नाही. Chandrapur Crime Surge महसूल, पोलीस, पर्यावरण, वन आणि खनिज विभाग या सर्व यंत्रणांची मुख्य कार्यालये जिल्ह्यात असूनही मोठ्या प्रमाणात शासकीय संपत्तीची लूट सुरू आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीच या अवैध धंद्यांना अभय देत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसायिक, उद्योजक आणि दुकानदारांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, अनेक जण व्यवसाय बंद करण्याच्या विचारात आहेत. Chandrapur Crime Surge शहरात संध्याकाळी सहानंतर नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत.
शासन-प्रशासन कुठे झोपले आहे?
कायद्याचा धाक संपला असून, पोलिसांची भूमिका केवळ वाहतूक नियंत्रण आणि किरकोळ प्रकरणे हाताळण्यापुरती मर्यादित राहिली आहे. पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चंद्रपूर गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. Chandrapur Crime Surge वेळेत यावर आळा घालण्यात आला नाही, तर चंद्रपूर हे मिर्झापूर किंवा वासेपूर बनायला वेळ लागणार नाही.
शिवसेनेचा इशारा – मोठ्या आंदोलनाची तयारी
शिवसेनेने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. Chandrapur Crime Surge जर प्रशासनाने वेळेत गुन्हेगारीवर नियंत्रण आणले नाही, तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही वाढत्या गुन्हेगारीविरोधात एकजूट होण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आणि प्रशासनाची आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढत असून, नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत. Chandrapur Crime Surge यावर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल. आता वेळ आली आहे, गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची.
Why is crime increasing in Chandrapur?
What actions are being taken against crime in Chandrapur?
How are illegal businesses affecting public safety?
What are the public demands regarding Chandrapur’s law enforcement?
#ChandrapurCrimeSurge #ChandrapurCrime #LawAndOrder #CrimeNews #IllegalActivities #PublicSafety #PoliceAction #MaharashtraNews #CrimeAlert #JusticeForAll #BreakingNews #CrimeRate #ChandrapurPolice #MaharashtraCrime #PublicDemand #StrictAction #IllegalBusiness #LawEnforcement #CrimeReport #CrimeWatch #SafetyMatters #MurderCases #GangWars #CityCrime #NewsUpdate #CrimeControl #JusticeSystem #LegalReform #PublicConcern #CrimePrevention #IllegalMarkets #PoliceFailure #PublicFear #CitizenRights #SafetyFirst #CrimeAwareness #UnderworldActivities #PoliticalIntervention #CorruptSystem #CrimeStatistics #NewsAlert #PoliceVsCrime #ChandrapurUpdates #IllegalTrade #SecurityMatters #CrimeCheck #CommunitySafety #BreakingCrime #ActionNeeded #TrendingNews