अडीच लाखाच्या मुद्देमालासह चार आरोपी अटकेत
कोरपना: स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कोरपना पोलीस ठाणे हद्दीतील लोणी गावालगत सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर धाड टाकली. यावेळी हारजितच्या जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. Cockfighting या कारवाईत ३,६०० रुपये रोख, चार झुंजीकरीता वापरण्यात येणारे कोंबडे आणि चार मोटारसायकली असा एकूण २,४५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींची नावे: १) अमोल साधुजी खरवडे (४० वर्षे, लोणी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) २) संजय शालीक क्षिरसागर (२९ वर्षे, वनसडी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) ३) अनिल किसन बेलेकर (५४ वर्षे, कोलगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) ४) राजेंद्र नानाजी खिरटकर (४६ वर्षे, गोधनी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ)
पोलिसांनी घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. Cockfighting या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. Cockfighting यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक कांकेडवार, श्री. बलराम झाडोकार, उपनिरीक्षक श्री. संतोष निंभोरकर, पोलीस हवालदार किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, वाहन चालक दिनेश अराडे यांचा सहभाग होता.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी कोंबड्यांच्या झुंजीवर मोठ्या प्रमाणावर पैशांची बाजी लावली होती. Cockfighting या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कोंबड्यांच्या झुंजी हा कायद्याने गुन्हा असून, प्राण्यांच्या छळाविरोधात तसेच जुगारविरोधी कडक कायदे अस्तित्वात आहेत. तरीही काही लोक अशा प्रकारे जुगार खेळत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. Cockfighting स्थानिक नागरिकांनी असे कोणतेही गैरप्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
What was the reason for the police raid in Korapna?
How many people were arrested in the cockfighting gambling raid?
What was seized during the police raid?
Under which law was the case registered?
#CockfightingRaid #IllegalGambling #PoliceAction #AnimalCruelty #GamblingBan #MaharashtraPolice #ChandrapurCrime #AnimalRights #BreakingNews #CrimeNews #IndianPolice #CockfightBan #IllegalBetting #StopAnimalCruelty #MaharashtraNews #KorapnaCrime #PoliceSeized #BettingRaid #RaidAlert #CrimeReport #LawEnforcement #JungleJustice #GamblingRaid #AnimalAbuse #JusticeForAnimals #RaidNews #TrendingNews #NewsUpdate #PoliceInvestigation #CrimeAwareness #IndianLaw #SocialJustice #AnimalProtection #PoliceCrackdown #CrimeBusted #JusticeServed #NoToGambling #FightForAnimals #LatestNews #BreakingUpdates #MaharashtraUpdates #NewsAlert #IllegalActivities #CrimeStoppers #ResponsibleGaming #StopGambling #LawAndOrder #NewsToday #ViralNews #PoliceNews #MahawaniNews #ChandrapurNews #KorpanaNews #Cockfighting #VeerPunekar