घरांचे छत कोसळून भारी नुकसान, ग्रामस्थ आक्रमक
राजुरा: तालुक्यातील सास्ती गावात वेकोलीच्या कोळसा उत्खननातील ब्लास्टिंगमुळे नागरिकांचे घरांवर संकट ओढवले आहे. २२ मार्च २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता शोएब रहीम शेख यांच्या संपूर्ण घराचे छत कोसळले. या घटनेत घराचे पूर्णतः नुकसान झाले. WCL Blasting Damage हा प्रकार वेकोलीच्या अनियमित आणि बेफिकीर ब्लास्टिंगमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही अनेक घरांना तडे गेले होते, परंतु वेकोली प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन करत नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
वेकोलीच्या उत्खनन क्षेत्रातील सास्ती गावाला मोठा फटका बसत आहे. सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, मंदिरासह सार्वजनिक ठिकाणीही मोठे नुकसान झाले आहे. WCL Blasting Damage सहा महिन्यांपूर्वी विक्रम आकापका आणि वसंता उपरे यांच्या घरांचे नुकसान झाले होते, मात्र त्यांनाही अद्याप न्याय मिळालेला नाही. शासन आणि वेकोली प्रशासन केवळ आश्वासनांवर ग्रामस्थांची दिशाभूल करत आहे.
गावकऱ्यांचे आंदोलन, वेकोलीची वेळकाढूपणा नीती
या घटनेनंतर गावकऱ्यांनी वेकोली प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. वेकोलीचे खान प्रबंधक मॅनेजर यांनी नुकसानग्रस्तांना बांधकाम साहित्य स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. WCL Blasting Damage मात्र, ग्रामस्थांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात कारवाई हवी, अशी ठाम भूमिका आहे. येलमा देवी मंदिर आणि इतर घरांच्या नुकसानीची पाहणी करून योग्य तो मोबदला दिला जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
गावकऱ्यांचा इशारा – आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या
गावातील अनेक कुटुंबे आता भयभीत झाली आहेत. दरवेळी ब्लास्टिंगच्या धक्क्याने घरांना तडे जात आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. WCL Blasting Damage सास्तीचे उपसरपंच सचिन कुडे यांनी वेकोली अधिकाऱ्यांशी चर्चा करत नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ वेकोलीच्या वेळकाढूपणाच्या धोरणावर नाराज आहेत.
सरकारी यंत्रणेची झोप कधी उघडणार?
सास्ती गावासारख्या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन चालते, मात्र सुरक्षेच्या उपाययोजना धाब्यावर बसवल्या जात आहेत. ब्लास्टिंगच्या तडाख्याने केवळ घरेच नव्हे, तर संपूर्ण गाव धोक्यात आला आहे. वेकोली प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. WCL Blasting Damage त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर संतप्त ग्रामस्थ पुन्हा तीव्र आंदोलन छेडतील, हे वेकोली प्रशासनाने लक्षात ठेवावे.
What caused the house collapse in Sasti?
How are villagers reacting to the Vekoli blasting issue?
Has the administration taken any action against WCL?
What are the villagers demanding from WCL?
#WCL #CoalMining #BlastingDamage #SastiProtest #Compensation #MiningHazards #HouseCollapse #Rajura #WCL #NagpurNews #Chandrapur #CoalIndia #MiningSafety #IndianMining #EnvironmentalDamage #PublicProtest #VillageCrisis #UnsafeMining #DamageControl #GovtNegligence #InfrastructureDamage #MiningAccident #RuralDevelopment #SaveVillages #BlastingImpact #VillageWoes #LandRights #CompensationDemand #CoalIndustry #MiningPollution #GovtFailure #ProtestNow #MiningThreat #BlastingEffect #Disaster #HousingRights #Negligence #CoalExtraction #SafetyFirst #StopUnsafeMining #BlastingIssue #MiningProblem #VillagersUnite #MiningDestruction #MiningBlast #WCLMining #MiningHazard #MiningProtest #MiningAccidents #IndianVillages #PublicAwareness #MiningJustice #MahawaniNews #MarathiNews #RajuraNews #SastiNews #ChandrapurNews #WCLBlastingDamage