मुक्ती फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; अद्वितीय योगदानासाठी महिलांचा गौरव सोहळा संपन्न
चंद्रपूर : मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने महिलांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वैदिक पद्धतीने "गर्भसंस्कार" कार्यक्रमाने झाली. संपूर्ण सोहळा आध्यात्मिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. Women Empowerment Awards 2025 समाजातील विविध स्तरांवरील महिलांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा मुक्ती फाऊंडेशनच्या मंचावर सन्मान करण्यात आला.
महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने समाजातील तळागाळातील महिलांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. मग ती भाजी विकून कुटुंबाचे पालन करणारी महिला असो, अथवा कीर्तनाच्या माध्यमातून संस्कृती जपणारी आजीबाई, प्रत्येकाचा सन्मान हा समाजातील आदर्श निर्माण करणारा ठरतो. या संकल्पनेतून मुक्ती फाऊंडेशनच्या प्रा. प्रज्ञा गंधेवार आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी हा गौरव सोहळा आयोजित केला.
किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान सोहळा
या कार्यक्रमाला आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महाविदर्भच्या संपादक कल्पनाताई पलिकुंडवार यांना "श्री नारीशक्ती पुरस्कार" प्रदान करण्यात आला. किशोरभाऊंनी यावेळी कल्पनाताईंच्या पत्रकारितेतील ३० वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाचा आढावा घेत, समाजासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
मान्यवर महिलांचा सन्मान
या गौरव सोहळ्यात अनेक नामांकित महिलांचा सन्मान करण्यात आला. Women Empowerment Awards 2025 या प्रसंगी मंचावर अॅड. क्षमा धर्मपुरीवार यांची विशेष उपस्थिती होती. तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छबुताई वैरागडे, सुवर्णाताई गुहे, संगीताताई लोखंडे, मेघा मावळे, चंदाताई ईटनकर, परवीन खान पठान, चैतालीताई नवले, डॉ. भारती दुधानी, दशरथ सिंग ठाकूर, बबनराव अनमुलवार, जयकुमार सिंग, पुरूषोत्तम राऊत, प्रा. रूपाली आवारी, श्रुती ठाकूर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
समाजसेवेत चमकणाऱ्या महिलांचा सन्मान
समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. Women Empowerment Awards 2025 सिंधुताई चौधरी, निर्मला लेनगुरे, दिक्षा सूर्यवंशी, सुनंदा पधरे, सुनिता कदम, कल्पना जयपूरकर, सुरेखा बोंडे, नलिनी देशमुख, विद्या वासेकर, स्नेहा भाकरे, अपर्णा निडे, वामिनी मेंढे, वर्षाताई निडे, सुनिता पूर्णये, सोनाली फुलभोगे, साधना लसुते, योगिता महाडोळे, सुवर्णा पेचे, बासलबार संगिता खंगार, विजयालक्ष्मी कोटकर, सायली वैद्य, प्रियंका दौड, सरला गवळी, शीतल काकडे, कविता कळसकर, आरती कैथवास, कल्पना नार्लावार, मायाताई उमरे, संजिवनी शंभरकर, हीना देसाई, विना धानमने, अक्षरी खोब्रागडे, बबीता पोखडे, उषाताई सास्तीकर, कलाताई तुरकर, प्रिती दडमल, अनुष्का ठाकरे, सुनिता पंधरे, सौनु ताई वैद्य, निशा झुरमुरे, प्रभा मते, पुष्या भोयर, अनिता वानखेडे, सारीका वाहाडे अशा अनेक महिलांना गौरवण्यात आले.
आशा वर्कर्सचा विशेष गौरव
कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा सन्मान हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. समाजासाठी दिलेल्या त्यागाचे कौतुक करत, या वर्कर्सना विशेष प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे संचालन सौ. नम्रता पित्तुलबार यांनी केले, तर आभार प्रदर्शन नलिनी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता महिला भजन मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
मुक्ती फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमातून समाजातील महिलांचे कार्य प्रकाशझोतात आले. त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन समाजाने त्यांना पाठबळ दिले, हे विशेष महत्त्वाचे ठरले. Women Empowerment Awards 2025 समाजात महिलांच्या योगदानाला योग्य स्थान देणाऱ्या अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
What was the purpose of the Mukti Foundation’s Women Empowerment Awards 2025?
Who were the key personalities present at the award ceremony?
How did the Mukti Foundation recognize the contributions of Asha workers?
What impact does such an event have on society?
#WomenEmpowermentAwards2025 #WomenEmpowerment #MuktiFoundation #Chandrapur #WomenAwards #SocialWork #InspiringWomen #WomenLeaders #AshaWorkers #NariShakti #WomensDay #StrongWomen #Motivation #Feminism #WomenInLeadership #CommunityService #SocialImpact #AwardCeremony #HonoringWomen #Activism #Equality #WomenInSociety #SupportWomen #Empowerment #Recognition #Leadership #SuccessStories #WomensRights #Philanthropy #Inspiration #RespectWomen #WomenAchievements #CelebratingWomen #WomensHistory #Awards2025 #HerStory #WomenSupportingWomen #SocialChange #WomensVoices #HonoringLeaders #WomenStrength #PositiveChange #RespectAndHonor #WomenCelebration #SocialResponsibility #SelfMadeWomen #WomenOfImpact #WomensPower #WomenIcons #AchievementUnlocked