नागरिक आक्रमक; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
जिवती | जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या दिरंगाईमुळे येल्लापुरातील नागरिकांना अजूनही शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Yellapur Water Crisis जानेवारी महिन्यात प्रशासनाला पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, मार्च महिना उजाडला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढून तीव्र संताप व्यक्त केला.
येल्लापुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येल्लापुर (बु.), येल्लापुर (खुद्द), गोंडगुडा आणि कोलामगुडा या चार गावांचा समावेश आहे. गावात एकूण सहा विहिरी असल्या तरी त्यापैकी तीन विहिरींनी पाणी देणे थांबवले आहे. तळ्याकाठच्या एका विहिरीवर संपूर्ण गाव अवलंबून आहे, मात्र ही विहीरही मार्चच्या अखेरीस कोरडी पडण्याची शक्यता आहे. Yellapur Water Crisis त्यामुळे संपूर्ण गाव पिण्याच्या पाण्याविना होरपळून निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू आहे, मात्र अद्याप ग्रामस्थांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. Yellapur Water Crisis खोदलेली पाइपलाइन धुळखात पडली आहे, टाक्या बांधून पूर्ण झालेल्या नाहीत आणि प्रशासनाचा कोणताही ठोस हस्तक्षेप नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा
गावकऱ्यांनी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. Yellapur Water Crisis मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आम्हाला नळ नाही, विहिरीत पाणी नाही, तर जगायचं कसं?” असा सवाल ग्रामस्थांनी केला.
प्रशासनाचे दुर्लक्ष – नागरिकांच्या आरोग्यावर संकट
पाण्याअभावी अनेक नागरिकांना अस्वच्छ पाणी पिण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या आणि संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होत असताना परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. Yellapur Water Crisis एकीकडे जिल्हातील मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना वन वन करावी लागत आहे तर दुसरीकडे जिल्हापरिषद मुख्याधिकारी मुख्यमंत्रणाकडून उत्तम कामगिरीची पाट थोपटून सम्मानित केले जात आहे.
नागरिकांची मागणी:
- जलजीवन मिशनच्या कामाला गती द्यावी व तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा.
- टँकरच्या माध्यमातून तात्पुरती पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
- नवीन विहिरी खोदण्यात याव्यात किंवा बंद पडलेल्या विहिरी दुरुस्त कराव्यात.
- योजना रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
प्रशासन काय करणार?
या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग येणार का, की नागरिकांना आणखी संघर्ष करावा लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. Yellapur Water Crisis नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र अद्यापही केवळ आश्वासनांची बोळवण सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसेल, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
What is the Yellapur Water Crisis about?
What is 'Ghagar Morcha' and why was it organized?
What are the key demands of the villagers?
Has the administration responded to the protest?
#YellapurWaterCrisis #GhagarMorcha #WaterShortage #SaveWater #JivtiNews #DrinkingWaterCrisis #MaharashtraDrought #WaterScarcity #WaterForAll #RuralCrisis #WaterSupplyIssue #GovtNegligence #VillagersProtest #WaterRights #RightToWater #SaveRuralIndia #ParchedVillages #DroughtRelief #WaterWoes #WaterCrisisIndia #DemandWater #WaterSolution #PaniAandolan #WaterStruggle #CleanWaterNow #ActForWater #VillageWaterCrisis #PaniBachao #जलसंकट #जलआंदोलन #WaterShortageIndia #IndiaNeedsWater #NoWaterNoLife #PaniPeRight #WaterManagement #WaterCrisis2025 #DroughtSolution #RuralWaterIssue #GramPanchayatIssue #TankersForWater #WaterPipeline #JalJeevanMission #GovernmentFailure #WaterScarcityAlert #ActionOnWaterCrisis #JivtiVillage #WaterCrisisSolutions #ProtestForWater #MaharashtraProtests #IndiaWaterIssues