वैद्यकीय अधिकारी, उपचार साधनांचा अभाव जबाबदार कोण?
राजुरा | प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बूज) हे नावापुरतं उरलेलं असून प्रत्यक्षात रुग्णसेवेचा एकही ठोस आधार उपलब्ध नाही, हे पुन्हा एकदा काल ७ एप्रिल दोन गंभीर घटनांमुळे स्पष्ट झालं आहे. Khadoli PHC Negligence वैद्यकीय अधिकाऱ्याची बेजबाबदार पण व नेहमी गैरहजर राहणे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा अभाव आणि यंत्रणांची बेफिकिरी यामुळे आज दोन महिला रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
एकीकडे शासन ‘सर्वांना आरोग्यसेवा’ अशी ग्वाही देतं, तर दुसरीकडे जिथे रुग्णांना जीव वाचवण्यासाठी तातडीची गरज असते, तिथे आरोग्य केंद्रांचे दरवाजे मात्र खुले असतात पण त्यामागे वैद्यकीय पोकळपणाचं भयावह वास्तव दडलेलं आहे.
घटना एक: रुग्णालयात रुग्ण, पण वैद्यकीय अधिकारी गायब
कल्पना संतोष बोबाडे रा. कढोली बु. यांना काल संध्याकाळी अचानक पोटात प्रचंड वेदना होऊन पोट फुगण्याची तक्रार झाली. कुटुंबीयांनी धाव घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली गाठलं, मात्र रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. Khadoli PHC Negligence त्यांना वैद्यकीय उपचाराची तातडीची गरज असूनही कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. वैद्यकीय अधिकारी उपलब्द नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं. या विलंबाने रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम व आर्थिक त्रास झाला आहे.
घटना दोन: बेहोश रुग्ण, आणि ‘नर्स’ एकटीच
स्वाती मनोहर जेणेकर रा. कढोली बु. यांना अचानक चक्कर येऊन त्या बेशुद्ध झाल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांनाही तत्काळ याच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. परंतु इथेही तीच कहाणी—ना वैद्यकीय अधिकारी, ना औषधं, ना साधनं. Khadoli PHC Negligence केवळ एक नर्स उपस्थित होती, परंतु तीही अशा आपत्कालीन परिस्थितीत उपचार देण्यासाठी असमर्थ होती. एखाद्या रुग्णाला उपचार न देता परत पाठवावं लागणं, ही आरोग्य व्यवस्थेची थेट विफलता आहे.
दैनंदिन संकटाची ही फक्त एक झलक
या आजच्याच घटना नव्हे, तर हे केंद्र गेले अनेक महिने अशाच परिस्थितीत चालू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेले असतानाही, सहसा एकही वैद्यकीय अधिकारी सापडत नाही. Khadoli PHC Negligence जर अधिकृत कर्मचारी कार्यरत असून ते सेवा देत नसतील तर हे कोणाचे अपयश? केवळ नावापुरती नेमणूक करून प्रशासन मोकळं होतं का?
नागरिकांच्या जिवाशी खेळ
कढोली (बूज) परिसरात आरोग्य केंद्र ही एकमेव वैद्यकीय सुविधा आहे. जवळपास ३०–३२ गावांतील रुग्ण यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हे केवळ दुर्लक्ष नाही, तर थेट जीवघेणा खेळ आहे. Khadoli PHC Negligence आपत्कालीन रुग्णांनी ‘प्राथमिक’ सेवा मिळवण्यासाठीच २०–३० किमी दूर जावं लागणं, ही कोणत्याही आरोग्य धोरणाचे पूर्ण अपयशाची कबुली आहे.
प्रशासनाला सवाल
- वैद्यकीय अधिकारी नसेल तर जबाबदार कोण?
- वैद्यकीय अधिकारांच्या अनुपस्थितीवर कोण कारवाई करतो?
- औषधं आणि उपकरणांचा तुटवडा कधी भरून निघणार?
- जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कधी व कोणती शिक्षा होणार?
या सर्व प्रश्नांना उत्तर देणं केवळ गरजेचं नाही, तर अनिवार्य आहे. एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर केवळ ‘डॉक्टर अनुपस्थित होते’ हे उत्तर पुरेसं नाही.
ग्रामस्थांच्या मागण्या ठाम आणि स्पष्ट
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु ‘सर्व सुरळीत’ अशे उत्तरं पाठवणं, हे आपली जबाबदारी झटकण्याची सोपी पद्धत झाली आहे. आता मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून खालील ठोस मागण्या केल्या आहेत:
- वैद्यकीय अधिकारांच्या अनुपस्थितीवर चौकशी करून कारवाई करा
- रुग्णालयात २४ तास वैद्यकीय अधिकारी आणि नर्स असावी
- प्राथमिक साधनं, औषधं आणि उपकरणांची तातडीने पूर्तता करा
- यंत्रणांच्या अपयशाबाबत जिल्हा प्रशासनाने खुलं स्पष्टीकरण द्यावं
सुधारणेऐवजी सवयीचं झालेलं दुर्लक्ष
चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या गंभीर अपयशाची सवयीची तमा न बाळगणारी प्रतिक्रिया हेच या व्यवस्थेचं ‘नवीन सामान्य’ झालं आहे. Khadoli PHC Negligence लोकांच्या जिवाशी खेळण्याचे परिणाम केवळ पत्रव्यवहारात सीमित राहत असतील, तर अशा यंत्रणांवर जनतेचा विश्वास उरणार नाही.
कोण घेणार जबाबदारी?
सरकारच्या आरोग्य विषयक दाव्यांचा जमिनीवर थेट अपमान होतो आहे. ‘प्राथमिक आरोग्य केंद्र’ हे केवळ इमारतीपुरतं उरलेलं आहे. सेवेशिवाय आरोग्य केंद्राची काय किंमत?
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ही केवळ मागणी नाही, तर गरज बनली आहे. अन्यथा उद्या एखाद्याचा जीव गेला, तर त्या मृत्यूच्या जबाबदारीपासून प्रशासन स्वतःची सुटका करू शकणार नाही.
What happened at the Khadoli (Buj) Primary Health Center?
Why were there no doctors available at the PHC?
What has been the response of the local community?
Has the administration taken any action yet?
#KhadoliPHCNegligence #HealthCrisis #RuralHealthcare #MedicalNegligence #IndiaHealthcare #PHCFailure #DoctorShortage #HealthcareScandal #PublicHealth #SaveLives #EmergencyCare #KhadoliBuj #SystemFailure #WomenHealthIgnored #HealthRights #DoctorAbsence #NoMedicalAid #HealthcareNeglect #VillagersProtest #RuralIndiaCrisis #MedicalSystemFail #PrimaryHealthCenter #HealthEmergency #IndiaNews #BreakingNewsIndia #GrassrootsCrisis #NegligenceAlert #HumanRightsViolation #NoDoctorsAvailable #PublicOutcry #RuralNeglect #IgnoredVoices #HealthCareSystemCollapse #MedicalSupportNeeded #GovernmentFailure #HealthcareAccountability #PHCProblems #WakeUpCall #PoorHealthInfrastructure #DoctorlessCenters #HealthInjustice #NeglectedVillages #FailingSystem #DemandActionNow #HealthcareForAll #RightToHealth #EmergencyIgnored #PatientAbuse #HealthcareCorruption #NeglectedLives #UrgentHealthCrisis #FixHealthcareNow