फड्यांचा ‘फिंगरप्रिंट माफिया’ ऑपरेशन उघड.
मयत महिला, बनावट कार्ड, GPS असूनही अफरातफर.
तक्रारदाराच्या जीवाला धोका, पोलीस व प्रशासनाच्या तोंडावर बोट.
राजुरा : तालुक्यातील देवडा गावातील नुसरत शेख यांनी एका निवेदनाद्वारे संपूर्ण तहसील कार्यालयाला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. Rajura Ration Scam त्यांच्या आरोपांनुसार तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दरमहा पाच लाखांचा काळा बाजार सुरू असून, यामध्ये जयराम फड नावाच्या इसमाचा प्रमुख सहभाग आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे – तहसील कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी या संपूर्ण प्रकरणात सहभागी आहेत किंवा मूग गिळून गप्प बसले आहेत.
‘बोगस’ बोटांचे साम्राज्य : मशीन घरात, वितरण गावात?
निवेदनानुसार, जयराम फड हा स्वतःच्या अंगठ्याच्या सहाय्याने नव्हे, तर इतर हमाल, मजूर यांच्या आधार कार्डाच्या आधारावर ‘फिंगरप्रिंट मशीन’ घरच्या घरी चालवतो. Rajura Ration Scam शासकीय स्वस्त धान्य वितरणाची मशीन गावात न वापरता स्वतःच्या घरी चालवली जाते, आणि हे सर्व लाईव्ह पाहिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
चार शॉप, एकच माणूस – कायद्याचा खेळखंडोबा
नुसरत शेख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जयराम फड हा चार दुकाने (१५०९२७८००१२४, १५०९२७८०००५९, १५०९२७८००१२१, १५०९२७८००११९) चालवतो. ही दुकाने केवळ कागदोपत्री असून, प्रत्यक्षात एकटाच इसम त्या सर्वांचे नियंत्रण करतो. हे दुकानदार नसतानाही धान्यवाटप करत आहेत – हा ‘सरळ सरळ क्रिमिनल फ्रॉड’ आहे.
GPS असूनही गाड्या अफरातफर करतायत – अधिकारी आंधळे?
स्वस्त धान्य वाहून नेणाऱ्या शासकीय गाड्यांमध्ये GPS सिस्टम लावलेली असूनही, जयराम फडच्या गाड्या रोज देवड्यातून धान्य उचलून राजुरातील मनमोहन सरडा यांच्याकडे विक्रीसाठी जातात. GPS डेटा तपासल्यास हा प्रकार उघड होऊ शकतो, मात्र तहसील प्रशासनाचे डोळे झाकले गेले आहेत का?
मयत महिलांचे कार्ड वापरून धान्यवाटप? – माणुसकीलाही काळिमा
सबळ पुराव्यानुसार, डोंगरगाव येथील मरण पावलेल्या महिलेस (कार्ड क्रमांक: २७२००४७३४८११) ‘जिवंत’ दाखवून तिच्या नावावर धान्यवाटप सुरू आहे. OTP सिस्टीमचा गैरवापर करून जयराम फडने तिच्या मोबाईलवर स्वतःचा नंबर नोंदवून वितरण केले. ही बाब फक्त ‘गैरप्रकार’ नसून, मानवतेचा घोर अपमान आहे.
तहसील प्रशासन गुन्हेगाराच्या बाजूने?
तक्रारदाराने गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, “तहसील कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकारी जयराम फडच्या मदतीला नेहमी धावून येतात. Rajura Ration Scam पत्रकारांनी अनेकदा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी याला वाचवले गेले.”
हा प्रकार दर्शवतो की – तहसील कार्यालय स्वत: गुन्हेगाराच्या पाठराखणीसाठी वापरले जात आहे.
“माझ्या शेतीवर कब्जा, माझ्या जीवाला धोका” – तक्रारदाराची धगधगती हाक
नुसरत शेख यांचा आरोप आहे की, त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीवर जयराम फडने बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. तसेच, “माझ्या जीवाला धोका आहे – जर मला काही झाले तर याला जबाबदार धरावे,” अशी थेट धमकी त्यांनी लेखी निवेदनात दिली आहे.
प्रशासन कुठे झोपले आहे? – जिल्हाधिकाऱ्यांना थेट जबाबदारी घ्यावी लागेल
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे निवेदन गेले असले तरी केवळ फाईल फिरवून प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकू शकत नाही. हा विषय गंभीर आहे. EC Act अंतर्गत तातडीने FIR दाखल होणे आवश्यक आहे.
GPS डेटा, मयत कार्ड, आधार मशीनमधील लॉग, वाहनांची चालननोंदी – हे सर्व तपासून एक विशेष तपास यंत्रणा नेमण्याची आवश्यकता आहे.
न्यायालयीन हस्तक्षेपाची वेळ आली आहे?
या प्रकरणात प्रशासनाचे मौन आणि पोलिसांची निष्क्रियता पाहता, आता यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप किंवा उच्चस्तरीय चौकशीची गरज निर्माण झाली आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकाही संशयास्पद ठरतात – एकाही लोकप्रतिनिधीने यावर आवाज उठवला नसल्याचे दिसून येते.
‘फड’च्या काळ्या साम्राज्यावर सरकारचा धाडस असेल का?
‘स्वस्त धान्य’ योजनेचा उद्देश गरीबांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे. Rajura Ration Scam परंतु येथे तीच योजना गैरव्यवहाराची साधन बनली आहे.
सरकार, प्रशासन आणि तपास यंत्रणा – या सर्वांनी तातडीने कृती न केल्यास, ही अफरातफर आणखी किती काळ चालेल?
"ही बातमी पुढील प्रकरणांकरता उघड ठेवा – तुम्ही जर या धान्य गैरव्यवहाराच्या साखळीचा अनुभव घेतला असेल, तर आम्हाला संपर्क करा. तुमची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल."
What is the Rajura Ration Scam about?
Who is the alleged mastermind behind the scam?
What is the role of the Tehsil officials in this scam?
What actions are being demanded against the scam?
#RajuraRationScam #RationFraud #PublicDistributionSystem #TehsilCorruption #BlackMarketing #ChandrapurNews #FIRDemand #CorruptOfficials #FoodGrainScam #RationShopScam #FakeRationCards #RationMafia #ECActViolation #GhostBeneficiaries #AdministrativeFailure #TehsilScam #DeadCardHolderFraud #GovernmentNegligence #FoodSecurityBreach #DigitalFraud #FingerprintScam #GPSScam #RationDistributionFraud #RajuraTehsil #TehsilCrime #WhistleblowerAlert #ScamExposed #ChandrapurDistrict #JayaramaFad #RationKingpin #PDSManipulation #AccountabilityDemanded #DistrictCollectorAlert #JusticeForDevda #PublicGrievance #PDSAbuse #OfflineScamOnlineProof #TehsilCoverUp #FraudulentPractices #DemandForFIR #MassiveCorruption #SystematicLoot #GrainBlackMarket #RajuraTruth #ExposeRationFraud #MediaPressure #InvestigativeJournalism #WhistleblowerRisk #SilentAdministration #PDSAccountability #VeerPunekarReport #Mahawani #RajuraNews #MahawaniNews